---Advertisement---

जेव्हा सेहवागने १० गडी बाद करणाऱ्या एजाजला दिला होता चोप, स्वत: गोलंदाजानेच दिला आठवणींना उजाळा

On: बुधवार, डिसेंबर 8, 2021 11:02 AM
Ajaz-Patel-and-Virender-Sehwag
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला होता.हा सामना अनिर्णीत राहिला होता, तर दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. या सामन्यात भारतीय संघाने ३७२ धावांनी विजय मिळवला.

असे असले तरी, या सामन्यातील एका डावात १० गडी बाद करणाऱ्या एजाज पटेलचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच वीरेंद्र सेहवागने देखील एजाज पटेलचे कौतुक केले होते. त्यानंतर एजाज पटेलने वीरेंद्र सेहवागला एका जुन्या घटनेची आठवण करून दिली आहे.

भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने एजाज पटेलचे कौतुक करत म्हटले की, “कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात १० गडी बाद करणं खूप मोठी गोष्ट आहे. हा दिवस तुला आयुष्यभर लक्षात राहील. मुंबईत जन्म घेत तू इतिहास रचला आहेस. ही ऐतिहासिक कामगिरी केल्यामुळे तुझे खूप अभिनंदन.”

एजाज पटेलने मुंबई कसोटीतील पहिल्या डावात १० गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. तरीदेखील न्यूझीलंड संघाला ३७२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

तसेच वीरेंद्र सेहवागने केलेल्या ट्वीटला प्रतिसाद देत एजाज पटेलने लिहिले की, “मला अजूनही आठवण आहे की, मी ईडन पार्क (ऑकलंड) मध्ये नेट गोलंदाज म्हणून आलो होतो. त्यावेळी तुम्ही माझ्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी केली होती.”

एजाज पटेल २००८-०९ दौऱ्याबद्दल बोलत असवा. त्यावेळी भारतीय संघाने न्यूझीलंडचा दौरा केला होता. त्यावेळी भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत कसोटी मालिकेत १-० ने विजय मिळवला होता, तर वनडे मालिका ३-१ ने आपल्या नावावर केली होती. हा वीरेंद्र सेहवागच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा न्यूझीलंड दौरा होता. कारण, त्यानंतर भारतीय संघाने २०१४ च्या सुरुवातीला न्यूझीलंडचा दौरा केला होता. त्यावेळी वीरेंद्र सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

न्यूझीलंडला धूळ चारल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सज्ज, ‘या’ ३ खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

मोठी बातमी: हरभजन करणार निवृत्तीची घोषणा? आयपीएलमध्ये मेंटर बनण्याची आली ऑफर

“आम्हाला आयपीएलचे आजोबा म्हणून हिणवले गेलेले, पण आम्ही…”; सीएसकेच्या खेळाडूने बोलून दाखवले शल्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---