भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) पुढील वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) मध्ये मोठ्या संघासह सपोर्ट स्टाफचा प्रमुख सदस्य म्हणून दिसू शकतो. हरभजनने आपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) साठी काही सामने खेळलेले. मात्र, युएई येथील उत्तरार्धात त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. हरभजन पुढील काही दिवसांत क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा करेल. त्यानंतर तो काही फ्रँचायझींच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होण्याच्या प्रस्तावापैकी एक प्रस्ताव स्वीकारेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आयपीएलच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर बोलतान वृत्तसंस्थेला सांगितले की, “हरभजन पुढील आयपीएल हंगामात सल्लागार, मार्गदर्शक (Mentor) किंवा सल्लागार गटाचा भाग असू शकतो. परंतु तो ज्या फ्रँचायझीशी बोलत आहे त्यांना त्याचा अनुभव वापरायचा आहे.” लिलावात खेळाडूंची निवड करण्यात फ्रँचायझीला मदत करण्यातही तो सक्रिय भूमिका बजावेल. हरभजनने नेहमीच खेळाडूंना तयार करण्यात स्वारस्य दाखवले आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाशी एक दशक जोडलेला असताना त्याची संघासोबतची हीच भूमिका होती. ( Harbhajan Singh Mentor)
हरभजन गेल्या वर्षी केकेआर संघामध्ये असताना वरुण चक्रवर्तीला मार्गदर्शन करताना दिसून आला होता. आयपीएलच्या शेवटच्या हंगामातील शोध असलेल्या व्यंकटेश अय्यरने यापूर्वी खुलासा केला होता की, “हरभजनने काही नेट सत्रांनंतर सांगितले होते की, मी लीगमध्ये यशस्वी होईल. विशेष म्हणजे मी त्यावेळी एकही सामना खेळलो नव्हतो.” गेल्या हंगामातही केकेआरचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅकुलम आणि कर्णधार ओएन मॉर्गन यांनी संघनिवडीच्या बाबतीत हरभजनच्या सल्ल्याचे पालन केलेले.
सूत्रांच्या माहितीनुसार, “हरभजनला पूर्ण चर्चा झाल्यानंतर निवृत्तीची औपचारिक घोषणा करायची आहे. त्याने फ्रँचायझींपैकी एकाशी चर्चा केली असून, खूप स्वारस्य दाखवले आहे. परंतु कराराची औपचारिकता संपल्यानंतरच तो याबाबत अंतिम निर्णय सांगेल.”
(Harbhajan Singh Retirement)
हरभजन हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानला जातो. त्याने मुंबई इंडियन्ससह तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे. यासोबतच, २०१८ आयपीएलवेळी तो चेन्नई संघाचा भाग असता चेन्नईने आपले तिसरे विजेतेपद जिंकले होते. हरभजन २०१६ पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/ashes-series-2021-22-1st-match-preview/
https://mahasports.in/virat-kohli-statement-on-indian-cricket-future/
https://mahasports.in/it-is-time-for-my-2nd-innings-yuvraj-singh-has-a-big-surprise-for-fans/