बुधवारपासून (७ डिसेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका सुरु होणार आहे. ही ७२ वी ऍशेस मालिका आहे. दोन वर्षांच्या अंतराने खेळली जाणारी ही स्पर्धा क्रिकेटजगतात लोकप्रिय आहे. १३९ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या ऍशेस मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये नेहमीच कडवी झुंज पहायला मिळते.
या स्पर्धेत आत्तापर्यंत ३३५ कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यातील १३६ सामन्यात ऑस्ट्रेलियाने तर १०८ सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. तसेच ९१ सामने अणिर्नित राहिले आहेत.
आत्तापर्यंत ७१ ऍशेस मालिका आयोजित करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये ३३ वेळा ऑस्ट्रेलियाने, तर ३२ वेळा इंग्लंडने मालिकेत विजय मिळवला आहे. तसेच ६ वेळा मालिका बरोबरीत सुटल्या आहेत.
साल १९८९ पासून २००२-०३ पर्यंत ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेवर वर्चस्व ठेवले होते. या १३ वर्षांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाने ८ वेळा ऍशेसवर कब्जा केला आहे. पण २००१ नंतर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडमध्ये एकदाही ऍशेस मालिका जिंकता आलेली नव्हती. २००१ नंतर ऑस्ट्रेलियाने २०१७-१८ पर्यंत ४ वेळा ऍशेस मालिका जिंकली, पण या मालिका त्यांनी मायदेशात जिंकल्या. मात्र, २०१९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने बरोबरी साधत ऍशेसवर कब्जा केला होता.
इंग्लंडने मागील २० वर्षात ५ वेळा ऍशेस जिंकली. यामध्ये त्यांनी २०१०-११ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिंकण्याचा कारनामाही केला. हा विजय अँड्र्यू स्ट्रॉसच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने मिळवला होता.
दरम्यान, बुधवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या ऍशेस सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने ११ जणांचा संघ, तर इंग्लंडने १२ जणांचा संघ घोषित केला आहे.
या ऐतिहासिक मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. त्याबद्दल सर्वकाही…
१. कधी होणार पहिला ऍशेस सामना?
-पहिला ऍशेस सामना ८ -१२ डिसेंबर २०२१ दरम्यान होणार आहे.
२. किती वाजता सुरु होणार पहिला ऍशेस सामना?
-पहिला ऍशेस सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पाहाटे ५.३० वाजता सुरु होणार आहे.
३. कुठे होणार आहे पहिला ऍशेस सामना?
-पहिला ऍशेस सामना ऑस्ट्रेलियामधील द गॅबा, ब्रेस्बेन स्टेडियमवर होणार आहे.
४. कोणत्या चॅनेलवर पाहता येणार पहिला ऍशेस सामना?
-पहिला ऍशेस सामना सोनी नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे.
५. पहिला ऍशेस सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
-पहिला ऍशेस सामना सोनीलीव (SonyLIV) या वेबसाईटवर ऑनलाईन पाहता येईल.
पहिल्या ऍशेस सामन्यासाठी असे आहेत संघ –
इंग्लंड – जो रूट (कर्णधार), स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, हसीब हमीद, जॅक लीच, डेविड मलान, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, मार्क वुड.
(यातून ११ जणांचा संघ निवडला जाईल)
ऑस्ट्रेलिया –
मार्कस हॅरिस, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लॅब्यूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.
ऍशेस २०२१-२२ मालिकेचे वेळापत्रक
८-१२ डिसेंबर २०२१ – पहिली कसोटी – द गॅबा, ब्रिस्बेन
१६-२० डिसेंबर २०२१ – दुसरी कसोटी – ऍडलेड ओव्हल
२६-३० डिसेंबर २०२१ – तिसरी कसोटी – मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड
५-९ जानेवारी २०२२ – चौथी कसोटी – सिडनी क्रिकेट ग्राऊंड
१४-१८ जानेवारी २०२२ – पाचवी कसोटी – ठिकणा अद्याप निश्चित नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हा’ दिग्गज म्हणतोय, “भारतीय क्रिकेट म्हणजे गुणवान खेळाडूंची फॅक्टरी”
आता टिकाकारांची बसणार दातखिळी! ‘आऊट ऑफ फॉर्म’ हार्दिकने फिटनेसवर सुरू केलंय काम- Video
पुन्हा क्रिकेटचं मैदान गाजवणार युवराज सिंग! व्हिडिओ शेअर करत म्हणे, ‘दुसऱ्या इनिंगची वेळ आलीय’