ऍडलेड येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला संघाने भारतीय संघाचा 8 विकेट्सने पराभव केला होता. या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली चांगली फलंदाजी करत होता. त्याने या सामन्यात 74 धावांची खेळी सुद्धा केली होती. मात्र, अजिंक्य रहाणेच्या चुकीच्या कॉलमुळे विराट कोहली धावबाद झाला. परंतु आता रहाणेने विराटची माफी मागितली आहे.
अजिंक्य रहाणे मेलबर्न येथे खेळल्या जाणाऱ्या दुसर्या कसोटी सामन्यापूर्वी म्हणाला, “त्यादिवसाचा खेळ संपल्यानंतर मी विराट कोहलीची माफी मागितली. मात्र, त्याने याचे वाईट वाटून घेतले नव्हते. तो (विराट) म्हणाला, ‘त्यावेळी काय परिस्थिती होती आपण दोघे समजू शकतो. क्रिकेटमध्ये हे सर्व होत राहते. ते विसरून पुढे जाण्याची गरज आहे.'”
सध्या भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने मान्य केले की, “त्या धावबादनंतर ऑस्ट्रेलिया संघाला सूर गवसला आणि त्यांनी हा सामना दीड दिवसाच्या आत जिंकला. तो म्हणाला की, ते अवघड होते आणि तोपर्यंत आम्ही चांगले खेळत होतो. त्याचबरोबर चांगली भागीदारी केली होती. त्या धावचीतनंतर ऑस्ट्रेलिया संघाने सामन्यावर पकड निर्माण करायला सुरुवात केली.”
भारतीय संघ त्या सामन्याच्या दुसर्या डावात फक्त 36 धावात गारद झाला होता आणि हा सामना संघाने 8 विकेट्सने गमावला होता. हा पराभव भारतीय संघासाठी खूप मोठा धक्का होता. कारण भारतीय संघ पहिल्या डावात मजबूत स्थितीत होता. त्याचबरोबर विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र, तिसर्या दिवशी ऑस्ट्रेलिया गोलंदाजांनी एका तासात भारतीय संघाची दाणादाण उडवली.
आता उर्वरित तीन सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व अजिंक्य रहाणे करणार आहे. कारण विराट कोहली आपल्या बाळाचा जन्म होणार आहे म्हणून पालकत्व रजेवर मायदेशी परतला आहे. त्यामुळे बॉक्सिंग डे दिवशी शनिवारी (26 डिसेंबर) मेलबर्न येथे दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्त्व करताना दिसेल.
अजिंक्य रहाणेची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी
अजिंक्य रहाणेने 66 कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यामधील 111 डावात खेळताना त्याने 42.45 च्या सरासरीने 4245 धावा काढल्या आहेत. त्यामध्ये 188 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 22 अर्धशतके आणि 11 शतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“ऑस्ट्रेलिया संघ मानसिक खेळ खेळण्यात पटाईत, मी मात्र ‘या’ गोष्टीवर करेल फोकस”
‘मला माझ्या फलंदाजी क्रमाबाबत लवचीकता ठेवायचीय’, ऑस्ट्रेलियन खेळाडूचे वक्तव्य
भारतीय संघ दबावात असल्याचे स्पष्ट; दुसर्या कसोटीच्या संघनिवडीवर माजी फलंदाजाची प्रतिक्रिया