---Advertisement---

क्रिडा विश्वावर शोककळा! १०३ शतके ठोकणारा इंग्लंडचा दिग्गज खेळाडू काळाच्या पडद्याआड

On: शुक्रवार, डिसेंबर 25, 2020 8:40 PM
---Advertisement---

इंग्लंडचे माजी सलामी फलंदाज जॉन एडरीच यांचे आज निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. डाव्या हाताचे फलंदाज जॉन यांनी काउंटी क्रिकेटमध्ये सरेकडून खेळताना 103 शतके केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) श्रद्धांजली अर्पण केली.

ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन म्हणाले, “जॉन यांच्या निधनाने आम्ही एक उत्कृष्ठ सलामी फलंदाज गमावला. ते काही मोजक्या खेळाडूपैकी एक होते. ज्यांनी इंग्लंडसाठी 5,000 हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.” ते म्हणाले, “1965 साली न्यूझीलंड विरुद्ध नाबाद 310 धावांची खेळी आजही कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून उभारलेली पाचवी सर्वोच्च खेळी आहे.”

त्याचबरोबर सरे कडून देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, “जॉन एडरीच हे आमच्या क्लबकडून खेळणाऱ्या सर्वात महान खेळाडूंपैकी एक होते. त्यांचे निधन आमच्यासाठी एक दुःखद क्षण आहे.”

इंग्लंड संघाचे माजी फलंदाज इयान बाॅथम यांनी जॉन एडरीच यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त करताना ट्वीट केले. त्यामधे त्यांनी लिहिले की, “ख्रिसमसच्या सकाळी एक दुख:द बातमी मिळाली. मला सांगण्यात आले की जॉन एडरीच यांचे निधन झाले. ते एक चांगले व्यक्ती होते, ज्यांच्यासोबत मी खूप वेळ घालवला आहे.”

जॉन एडरीच यांची कामगिरी
जॉन एडरीच यांनी इंग्लंड संघासाठी 77 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यात त्यांनी 43.54 च्या सरासरीने 5318 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी सरे संघाकडून खेळताना काउंटी क्रिकेटमध्ये 39,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये 103 शतके आणि 188 अर्धशतके ठोकली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

अजिंक्य रहाणेने मागितली ‘या’ खेळाडूची माफी, स्वत: केला खुलासा

“ऑस्ट्रेलिया संघ मानसिक खेळ खेळण्यात पटाईत, मी मात्र ‘या’ गोष्टीवर करेल फोकस”

कांगारूंच्या ‘या’ गोष्टीची आम्ही पर्वा करत नाही; दुसर्‍या कसोटीपूर्वी अजिंक्य रहाणेची प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---