आज(4 मे) आयपीएल 2019मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात 52 वा सामना फिरोजशहा कोटला स्टेडियमवर होणार आहे. पण सामन्याआधीच राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ पुन्हा ऑस्ट्रेलियाला परतल्याने उर्वरित आयपीएल मोसमासाठी राजस्थानचे कर्णधारपद पुन्हा अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे.
याबद्दल शुक्रवारी(3 मे) राजस्थान रॉयल्स संघाने घोषणा केली आहे. रहाणेने या आयपीएल मोसमात सुरुवातीला राजस्थानचे नेतृत्व केले आहे. पण पहिल्या 8 सामन्यांनतर त्याला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले. रहाणेने नेतृत्व केलेल्या 8 सामन्यांपैकी राजस्थानला फक्त 2 सामन्यात विजय मिळवता आला.
पहिल्या 8 सामन्यांनंतर रहाणे ऐवजी स्मिथला कर्णधार करण्यात आले. स्मिथने नेतृत्व केलेल्या 5 सामन्यांपैकी राजस्थानने 3 सामने जिंकले तर एका सामन्यात पराभव स्विकारला आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला.
पण स्मिथ 2019 विश्वचषकाच्या तयारीसाठी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या कॅम्पमध्ये सामील होण्यासाठी मायदेशी परतला आहे. त्यामुळे रहाणे हा नेतृत्वासाठी चांगला पर्याय असल्याचे राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट हेड झुबीन भारुचा यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, ‘आम्ही अजिंक्यला संघाचे नेतृत्व स्विकारण्याची विनंती केली होती. त्यानेही खऱ्या रॉयल प्रमाणे ही जबाबदारी स्विकारताना मोठे धैर्य दाखवले आहे. त्याच्यासाठी मागील सीटवर बसून फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करणे सोपे होते. पण त्याने नेतृत्वाची जबाबदारी स्विकारली आहे.’
‘तो नेहमीच आमच्या नेतृत्व करणाऱ्या आणि महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या गटाचा भाग होता. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तो आम्हाला विजय मिळवण्यासाठी चांगले मार्गदर्शन करेल.’
या सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफच्या आशा जिवंत ठेवण्याचे आव्हान राजस्थान समोर आहे. तर दिल्ली गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांवर येण्यासाठी प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
–न्यूझीलंड ओपन: एचएस प्रणॉयचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव, भारताचेही आव्हान संपुष्टात
–‘गोलंदाजांनी तूला कुठे चेंडू टाकायचा?’ बुमराहचा पंड्याला प्रश्न; पहा व्हिडिओ
–२३ वर्षांपासून लपवलेल्या वयाचा अखेर आफ्रिदीने केला खूलासा…