न्यूझीलंड ओपन: एचएस प्रणॉयचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव, भारताचेही आव्हान संपुष्टात

भारताचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयला न्यूझीलंड ओपन स्पर्धेत आज(3 मे) उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या कंता सुनीयामा विरुद्ध पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे या स्पर्धेतील भारताचे आव्हानही संपूष्टात आले आहे.

बिगर मानांकन असलेल्या प्रणॉयने कंताला चांगली लढत दिली होती. परंतू तीन सेटमध्ये रंगलेल्या या सामन्यात कंताने प्रणॉयवर 21-17,15-21,14-21 अशा फरकाने मात केली.

या सामन्यात प्रणॉयने पहिला सेट जिंकून आघाडी घेतली होती. परंतू पाचव्या मानांकित कंताने चांगले पुनरागमन करत पुढील दोन सेट जिंकून सामनाही जिंकला.

या लढतीत प्रणॉयने पहिल्या सेटमध्ये 17-13 अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर कंताने चांगली लढत देत दोघांच्या गुणांमधील फरक 18-17 असा कमी केला. यानंतर प्रणॉयने तीन गुण घेत पहिला सेट जिंकला.

दुसऱ्या सेटमध्येही प्रणॉयने चांगली सुरुवात केली होती. त्याने 11-5 अशी मध्यंतरापर्यंत आघाडी घेतली होती. परंतू नंतर त्यांच्याकडून अनेक चूका झाल्या. त्यामुळे या संधीचा कंताने फायदा घेत सलग 8 गुण जिंकत 14-11 अशा फरकाने आघाडी घेतली आणि अखेर 14-14 अशा बरोबरीनंतर 21-15 अशा फरकाने हा सेट जिंकत सामन्यात बरोबरी साधली.

तिसऱ्या सेटमध्येही या दोघांमध्ये कडवी झूंज पहायला मिळाली. पण 14-14 अशा बरोबरीनंतर मात्र कंताने प्रणॉयवर मात करत 21-14 अशा फरकाने हा सेट जिंकत सामनाही जिंकला आणि उपांत्यफेरीत प्रवेश केला.

उपांत्य फेरीत कंताचा सामना तिसऱ्या मानांकित जोनाथन क्रिस्टीशी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘गोलंदाजांनी तूला कुठे चेंडू टाकायचा?’ बुमराहचा पंड्याला प्रश्न; पहा व्हिडिओ

२३ वर्षांपासून लपवलेल्या वयाचा अखेर आफ्रिदीने केला खूलासा…

पुढील आयपीएल मोसमात धोनी ऐवजी सुरेश रैना करणार सीएसकेचे नेतृत्व?

You might also like

Leave A Reply