भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे मंगळवारी (6 जून) वयाची 35 वर्ष पूर्ण करत आहे. आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत खास करून कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आपली एक विशेष ओळख बनवली. 7 जूनपासून सुरू होत असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात तो जवळपास दीड वर्षांनी भारताचे प्रतिनिधित्व करेल. काही काळ भारतीय संघाचे नेतृत्व भूषवलेल्या अजिंक्यने ती भूमिका देखील उत्कृष्टपणे पार पाडली. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाचा अद्याप एकदाही पराभव झाला नसून, 2020-2021 बॉर्डर-गावसकर ट्रॉफी भारत ऑस्ट्रेलियात जाऊन जिंकला होता. आपल्या शांत व संयमी स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्यची लव्हस्टोरी फिल्मी आहे.
सोशल मीडियावर अनेकदा दोन फोटो व्हायरल होत असतात. यामध्ये अजिंक्य व त्याची पत्नी राधिका यांचा कॉलेज जीवनातील एक तर सध्याच्या काळातील एक फोटो असतो. दोघे एकमेकांना कशी साथ देतात, हे त्यातून दर्शवले जाते. राधिका व अजिंक्य दोघेही एकाच सोसायटीत राहत. त्यांची आधी केवळ तोंडओळख होती. मात्र, राधिका अजिंक्यच्या बहिणीसोबत कॉलेजला जाऊ लागल्यानंतर ते सातत्याने भेटू लागले व त्यांच्या प्रेम सुरू झाले.
ते अनेकदा सोसायटीमध्येच भेटत. आत्ता फेसबुक इंस्टाग्राम प्रमाणे त्यावेळी चलनात असलेल्या ऑर्कुट या सोशल मीडिया साइटवर दोघांचे संभाषण होत. त्यानंतर त्यांनी या नात्याची कल्पना आपल्या घरातील लोकांना दिली व 2014 मध्ये ते विवाहबंधनात अडकले. आता या जोडप्याच्या संसार वेलीवर दोन गोंडस मुली देखील आहेत.
अजिंक्य मागील दीड वर्षापासून भारतीय संघाबाहेर होता. या काळात आपल्या कुटुंबाने आपल्याला खंबीर साथ दिल्याचे त्याने म्हटले. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्ससाठी दमदार खेळ दाखवत संघाला विजेते बनवण्यात मोठी भूमिका बजावली. त्यानंतर आता भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकून देण्याचे शिवधनुष्य त्याला पेलावे लागणार आहे.
(Ajinkya Rahane Birthday Special Ajinkya Rahane And Radhika Dhopavkar Lovestory)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हेजलवूडच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात सामील झालेला पठ्ठ्या आहे तरी कोण, भारताची डोकेदुखी वाढवणार का?
Cricket Ball: डब्ल्यूटीसी फायनलमध्ये वापरला जाणार Duke Ball, ‘या’ 3 चेंडूंनी आख्खं जग खेळतं क्रिकेट