---Advertisement---

तिसऱ्या कसोटीत ‘टेस्ट स्पेशलिस्ट’ पुजाराचा कटणार पत्ता? उपकर्णधार रहाणेने दिले ‘असे’ संकेत

On: मंगळवार, ऑगस्ट 24, 2021 12:29 PM
Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane
---Advertisement---

आपल्या चिवट फलंदाजीसाठी ओळखला जाणारा भारतीय संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला बऱ्याच काळापासून अतिशय वाईट फॉर्मचा सामना करावा लागत आहे. पुजारासारख्या फलंदाजाला गेल्या दोन वर्षांपासून शतक करता आलेले नाही. म्हणून त्याच्यावर जोरदार टीकाही होत आहे. आता संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने चेतेश्वर पुजाराला पुढील सामन्यात स्थान मिळेल की नाही? हे सूचित केले आहे. याशिवाय रहाणेने पुजाराच्या फलंदाजीबाबतही मोठे विधान केले आहे. 25 ऑगस्टपासून लीड्स येथे इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात तिसरा कसोटी सामना होणार आहे.

अजिंक्य रहाणे वगळता चेतेश्वर पुजाराही इंग्लंड दौऱ्यावर जास्त धावा करू शकला नाही. रहाणेच्या चार डावांमध्ये एकूण 65 तर पुजाराकडे एकूण 70 धावा आहेत. रहाणे पुजाराच्या फलंदाजीवर म्हणाला, “पुजारा आणि मी बऱ्याच काळापासून खेळत आहोत. दबाव आणि परिस्थिती कशी हाताळायची हे आम्हाला माहित आहे. आम्हाला त्यांची चिंता नाही. आम्ही फक्त संघावर लक्ष केंद्रित करत आहोत. जे आपल्या नियंत्रणात नाही, आम्ही त्याबद्दल विचार करत नाही.”

रहाणेच्या या विधानावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, सध्यातरी पुजारासारख्या अनुभवी फलंदाजाचा पत्ता भारतीय संघातून कापला जाणार नाही.

खरं तर, जेव्हापासून पुजारा खराब फॉर्ममधून जात आहे, तेव्हापासून याबद्दल जास्त बोलले जात आहे की लवकरच त्याला संघातून वगळण्यात येईल. पुजाराची जागा सूर्यकुमार यादव संघात घेऊ शकतो, असे अनेक दिग्गजांचे मत आहे. सूर्यकुमारने अनेक प्रसंगी स्वतःला सिद्ध केले आहे आणि लवकरच तो भारताच्या कसोटी संघातही दिसू शकतो.

रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत शतक झळकावले होते. त्यानंतर रहाणेने 16 कसोटी डावांमध्ये केवळ दोन अर्धशतके केली आहेत. आपल्या फॉर्ममध्ये परतण्याबाबत रहाणे म्हणाला, “लॉर्ड्सवर खेळलेली खेळी माझ्यासाठी समाधानकारक होती. मी प्रत्येक सामन्यात योगदान देण्यावर विश्वास ठेवतो. मी फक्त संघाबद्दल विचार करतो. मला वाटते 61 किंवा 62 धावांचे योगदान देणे देखील महत्त्वाचे आहे. हे माझ्यासाठी खूप समाधानकारक बाब आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

व्वा व्वा! विरोधी संघाच्या दिग्गजाकडूनच भारताला गुरुमंत्र; ‘अशी’ जिंकता येईल हेडिंग्ले कसोटी

हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडकडून ‘हे’ २ नवीन खेळाडू मैदानात उतरणार, कर्णधार रूटने दिले संकेत

वुडच्या बदली खेळाडूने भारतीयांची वाढवली धडधड! ‘या’ अप्रतिम कामगिरीने गाजवलंय लीड्सचं मैदान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---