---Advertisement---

रोहितच्या ‘त्या’ प्रश्नावर रहाणेने दिले असे मराठीत उत्तर!

On: शनिवार, ऑक्टोबर 26, 2019 10:50 AM
---Advertisement---

भारतात सध्या दिवाळीची धामधूम आहे. सर्वत्र दिवाळीची तयारी चालू असल्याचे चित्र दिसून येत आहे. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेही दिवाळीची तयारी सुरु केली असून त्याने नुकताच दिवाळीसाठी खरेदी केल्यानंतरचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वीच कन्यारत्न प्राप्त झालेल्या रहाणेने त्याची पत्नी राधिकाबरोबरचा फोटो इंस्टाग्रामला शेअर केला आहे. हा फोटो एका रेस्टॉरंटमधील असल्याचे दिसून येत आहे. पण रहाणेने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘राधिकाबरोबर दिवाळीची खरेदी. घरी असलेल्या छोट्या व्यक्तीसाठी यावेळी खास खरेदी.’

https://www.instagram.com/p/B4Chjz7hfvv/

त्यामुळे रहाणेच्या या फोटोवर प्रतिक्रिया देताना भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने लिहिले आहे की ‘खरेदी? मला तर हे एका बुफे प्रमाणे वाटत आहे.’

रोहितच्या या प्रतिक्रियेवर उत्तर देताना रहाणेने लिहिले, ‘अरे खरेदीनंतर लंचपण(जेवणपण). तूलाही बोलावतो पुढच्यावेळी.’

Screengrab: Instagram/Ajinkya Rahane

भारतीय संघाची नुकतीच काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका संपली आहे. भारताने 3 -0 असा विजय मिळवलेल्या या मालिकेत रोहित आणि रहाणे या दोघांनीही शानदार कामगिरी केली.

रोहितने या मालिकेतून पहिल्यांदाच कसोटीत सलामीला फलंदाजी केली. त्याने सलामीवीर म्हणून या मालिकेत 4 डावात 2 शतके आणि 1 द्विशतकासह 529 धावा केल्या. तसेच रहाणेने 4 डावात 1 शतकासह 216 धावा केल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---