तिरुअनंतपूरम। इंडिया ए संघाने इंग्लंड लायन्स संघाला दुसऱ्या वन-डे सामन्यात 138 धावांनी पराभूत केले आहे. यामुळे इंडिया ए संघ 5 वन-डे सामन्यांच्या मालिकेत 2-0ने आघाडीवर आहे. याआधीचा सामना भारताने 3 विकेट्सने जिंकला होता.
या दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंड लायन्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी तडा देत अर्धशतकी खेळी केल्या.
रहाणे आणि विहारी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 180 धावांची मोठी भागीदारी रचली. यामध्ये रहाणेने 4 चौकार आणि 4 षटकाराच्या सहाय्याने 117 चेंडूत 91 धावांची खेळी केली. विहारीनेही 83 चेंडूत 92 धावा करत रहाणेला योग्य साथ दिली.
यामुळे इंडिया एने 6 विकेट्स गमावत 303 धावा केल्या. यावेळी श्रेयस अय्यरनेही 65 धावांची खेळी केली.
फलंदाजी बरोबर गोलंदाजीच्या विभागातही इंडिया एची कामगिरी अप्रतिम ठरली. त्यांनी इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करू दिली नाही. त्याच्यांकडून यष्टीरक्षक अलेक्स डेविजने सर्वाधिक 48 धावा केल्या.
या सामन्यात मंयक मारकंडेने भारताकडून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याला शार्दुल ठाकुर आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत चांगली साथ दिली. तर दिपक चहर, सिद्धार्थ कौल आणि विहारी या तिघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
–शिखर धवनला सतावत आहे या गोष्टीची चिंता…
–टीम इंडियाविरुद्ध दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल न्यूझीलंडची रणनीती…
–असे नक्की झाले तरी काय की कोहली आणि पीटरसनने केले एकमेकांना ट्रोल