---Advertisement---

BBL FINAL; होबार्ट हरिकेन्सने रचला इतिहास, पहिल्यांदाच जेतेपदावर कोरले नाव

On: सोमवार, जानेवारी 27, 2025 8:42 PM
---Advertisement---

आज (27 जानेवारी) रोजी बिग बॅश लीगचा (Big Bash League) फायनल सामना खेळला गेला. दरम्यान सिडनी थंडर आणि होबार्ट हरिकेन्स हे 2 संघ आमने-सामने होते. त्यामध्ये होबार्ट हरिकेन्सने (Hobart Hurricanes) सिडनी थंडरचा धुव्वा उडवत पहिल्यांदाच बिग बॅश लीगचे विजेतेपद पटकावले आहे. सोमवारी खेळल्या गेलेल्या फायनल सामन्यात होबार्ट हरिकेन्सने डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) सिडनी थंडरचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला.

होबार्ट हरिकेन्सने टाॅस जिंकून प्रथम सिडनी थंडरला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. दरम्यान सिडनी थंडरने मर्यादित 20 षटकांत 7 गडी गमावून 182 धावा धावफलकावर जोडल्या. प्रत्युत्तरात मिशेल ओवेनच्या (Mitchell Owen) झंझावाती शतकाच्या जोरावर होबार्ट हरिकेन्सने केवळ 14.1 षटकांतच विजय मिळवला. मिचेल ओवेनने 42 चेंडूत 108 धावा केल्या. दरम्यान त्याने 6 चौकारांसह, 11 षटकार लगावले. नॅथन एलिसच्या (Nathan Ellis) नेतृत्वाखाली होबार्ट हरिकेन्स संघाने 14 वर्षांचा दुष्काळ संपवत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मिचेल ओवेनने होबार्ट हरिकेन्स संघाला धमाकेदार सुरुवात दिली. त्याने फायनलमध्ये 39 चेंडूत शतक झळकावले आणि हे त्याचे या हंगामातील दुसरे शतक होते. मिचेल बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेडने 17 चेंडूत नाबाद 32 धावा आणि बेन मॅकडर्मॉटने 12 चेंडूत नाबाद 18 धावा करत होबार्ट हरिकेन्सला केवळ 14.1 षटकांत विजय मिळवून दिला आणि संघाला पहिले विजेतेपद मिळवून दिले. या सामन्याचा सलामीवीर पुरस्कार मिचेल ओवेनला देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या-

“एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये चुकीच्या फ्रँचायझीकडू खेळला” माजी क्रिकेटपटूचा विराटच्या RCBवर निशाणा
बुमराहने रचला इतिहास, 6 वर्षांनंतर भारतीयाने जिंकला ‘कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार
स्म्रीती मानधनाने पटकावला ‘आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ इयर’ पुरस्कार…!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---