भारतीय संघाचा कसोटी स्पेशलिस्ट फलंदाज अशी ओळख अजिंक्य रहाणे याची आहे. रहाणे सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. पण रणजी ट्रॉफी 2024 मध्ये तो आपल्या संघासाठी कर्णधाराची भूमिका पार पाडत आहे. साखळी फेरीतील 7 पैकी 5 सामन्यांसाठी त्याने मैदानात उपस्थिती लावली. मुंबई संघ रहाणेच्या नेतृत्वात चालू रणजी हंगामात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला आहे. उपांत्यपूर्व सामना खेळण्याआधी कर्णधार रहाणेच्या घरी एक नवीन सदस्य सामील झाला आहे.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या घरी आलेला नवीन सदस्य कोणी व्यक्ती किंवा प्राणी नाही. हा सदस्य म्हणजे त्याने घेतलेली नवीन कोरी मर्सिडीज मेबॅक जीएलएस 600 ही एसयूवी गाडी आहे. भारतीय बाजारात या लग्जरी एसयूवीची किंमत 2.96 कोटी रुपये इतकी आहे. अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिका हे दोघे नव्या गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी उपस्थित होते.
Congratulations to Ajinkya Rahane on his new acquisition! The Mercedes-Maybach GLS 600 is sure to provide him with ultimate comfort and luxury on the road.😍💥🤩#AjinkyaRahane #Mumbai #CSK #IPL2024 #RanjiTrophy pic.twitter.com/Q8hqcoRxrk
— cine_sdn (@sdn789_) February 20, 2024
मर्सिडीज मेबॅक जीएलएस 600 ही सध्या बाजारात चर्चेत असेसली एसयूवी आहे. या आलिशान गाडीच्या केबिनमध्ये बसल्यानंतर एक अप्रतिम लग्जरी अनुभव मिळतो. रहाणेच्या आधी अनेक बॉलिवूड अभिनेत्यांकडे ही लग्जरी एसयूवी आहे. यात शाहीत कपूर, शिल्पा शेट्टी, दीपिका पादुकोण, रणवी सिंग, क्रिती सॅनन, अर्जुन कपूर, आयुष्मान खुराना, अजय देवगन, रामजरण आणि दुलकर सलमान अशा स्टार्सचा समावेश आहे.
Veteran Indian cricketer Ajinkya Rahane has added an extravagant car to his collection as he bought a Mercedes-Benz GLS Maybach GLS 600, as per a picture going viral on social media. The price of the vehicle is reportedly an astonishing ₹3.25 crore as Rahane clicked. pic.twitter.com/yz7YMw0aef
— Manjeet Singh (@manjeet85916) February 21, 2024
मर्सिडीज मेबॅक जीएलएस 600 या गाडीचा लूक एकदम दमदार आहे. या एसयूवीमध्ये एक स्पोर्ट्स फील चालकाला आणि पाहणाऱ्यांना मिळतो. समरोच्या भागात मेबॅकचे खास क्रोम ग्रिल आहे. पातळ एलईडी हेडलॅम्प आणि मोठा बंपर याकडे सर्वांचे लक्ष वेधले जाते. गाडी 4 आणि 5 सीटर या दोन प्रकारात उपलब्ध आहे. मागच्या बाजूच्या दोन सीट्स सोफ्याप्रमाणे वापरता येऊ शकतात. म्हणजेच या सिट्सला रिक्लाइनर आहे, जे मागे बसणाऱ्याला पूर्ण कंम्फर्ट मिळवून देते. रहाणेने खरेदी केलल्या या गाडीत 4.0 लीटी व्ही-8 इंजिन दिले आहे. अवघ्या 4.9 सेकंदात ही गाडी ताशी 0 ते 100 किमीचा वेग घेऊ शकते.
दरम्यान, अजिंक्य रहाणे मुंबईकडून रणजी ट्रॉफी 2024च्या उपांत्यपूर्व सामन्यात खेळताना दिसू शकतो. हा सामना 23 फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये आयोजित केली गेला आहे. रहाणेने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी फॉरमॅटमध्ये खेळला होता. वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने अनुक्रमे 2018 आणि 2016 मध्ये आपला शेवटचा सामना खेळला आहे. असे असले तरी, रणजी हंगामात सासत्याने सहभाग घेतल्यानंतर भारतीय कसोटी संघात त्याचे पुनरागमन होणार का? हा प्रश्न कायम आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच भारतीय संघातून बाहेर असलेल्या सर्व खेळाडूंनी रणजी ट्रॉफी खेळण्याच्या सुचना केल्या होत्या. पण काही खेळाडू तरीही रणजी हंगामात सहभागी झाले नाहीत. बीसीसीआय या सर्वांबाबत काय कारवाई करणार, हे पाहण्यासारखे असेल. (Ajinkya Rahane has bought a new car worth Rs 3 crore)
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 : आयपीएलमध्ये सरफराज खानला घेण्यासाठी 2 संघांमध्ये स्पर्धा! पाहा कोणता संघ मारेल बाजी
श्रेयस अय्यर आयपीएलला मुकणार? केकेआरला सलग दुसऱ्या वर्षी बसू शकतो मोठा झटका