मुंबईकर फलंदाज सरफराज खान याने आपल्या कसोटी कारकीर्दीची अविस्मरणीय सुरुवात केली आहे. सरफराज खान याने कसोटी पदार्पणात इंग्लंड विरुद्ध राजकोट येथे सलग दोन अर्धशतके ठोकली आहेत. यामध्ये सरफराज खान याने पहिल्या डावात 48 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. सरफराजने पहिल्या डावातील या अर्धशतकी खेळीत 7 चौकार आणि 1 सिक्स मारला होता. तसेच यानंतर दुसऱ्या डावातही सरफराजने 68 धावांची नाबाद खेळी केली होती.
याबरोबरच, सरफराजच्या या दोंन्ही खेळी पाहून सरफराज आयपीएल फ्रँचायझींच्या नजरेत आला आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये दोन संघात त्याला विकत घेण्यासाठी स्पर्धा रंगली आहे. रिपोर्टनुसार, एमएस धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ सरफराजला आपल्या संघात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत आयपीएल 2024 संदर्भात लिलाव झाला की नाही हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
अशातच खेळाडूंचा लिलाव झाला असून, त्यात सरफराजला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हंते अशा परिस्थितीत सर्फराज आता कोणत्याही संघाकडून कसा खेळू शकेल? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. परंतु सर्फराज खान आयपीएल 2024 साठी कोणत्याही संघाचा तेव्हाच भाग बनू शकतो जेव्हा त्या संघाचा खेळाडू टूर्नामेंटमधून आपले नाव मागे घेतो किंवा इतर कारणांमुळे तो संघाबाहेर असतो. अशा परिस्थितीत त्या खेळाडूच्या जागी सरफराज खानला संघाचा भाग बनवले जाऊ शकते.
अशा परिस्थितीत सरफराज खान कोणत्याही संघात प्रवेश करणार असल्याची बातमी लवकरच समोर येण्याची दाट शक्यता आहे. तसेच सरफराज खानने आतापर्यंत त्याच्या आयपीएल करिअरमध्ये चांगली कामगिरी केली आहे. याच कारणामुळे आयपीएल 2024 मध्ये खेळाडूची निवड होऊ शकली नाही, पण आता जेव्हा या खेळाडूने इंग्लंडविरुद्ध चौकार लगावले, तेव्हा संघ पुन्हा एकदा सरफराजला बोलावण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, सरफराज खान आतापर्यंत 3 संघांसाठी आयपीएलमध्ये खेळला आहे, ज्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांचा समावेश आहे. सरफराजने या 3 संघांसाठी एकूण 50 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 22.50 च्या सरासरीने केवळ 585 धावा केल्या आहेत. या काळात त्याने केवळ एक अर्धशतकी खेळी देखील केली आहे. अशा परिस्थितीत या खेळाडूला पुन्हा एकदा नशीब चमकवण्याची संधी मिळते की नाही हे बघावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –