Ajinkya Rahane Test Retirement Plan: भारतीय संघाबाहेर असलेला स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणे अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनाची वाट पाहत आहे. (Ajinkya Rahane Test cricket Comeback) रहाणेने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 5 हजारहून अधिक धावा केल्या आहेत. मात्र, बऱ्याच काळापासून तो भारतीय संघातून बाहेर आहे. लॉर्ड्स कसोटीदरम्यान स्काय स्पोर्ट्सशी बोलताना भारतीय संघाच्या या माजी उपकर्णधाराने सांगितले की, “मला अजूनही भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळायचे आहे.” (Ajinkya Rahane Lords interview)
अजिंक्य रहाणे शेवटचा भारतासाठी 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. रहाणेला अजूनही कसोटी क्रिकेट सर्वात जास्त आवडते. स्काय स्पोर्ट्सशी बोलताना तो म्हणाला, “मला अजूनही कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. मी कसोटी क्रिकेटचा वेडा आहे. माझ्यासाठी कसोटी क्रिकेट म्हणजे फोकस आणि नियंत्रणासह क्रिकेट खेळणे.” (Ajinkya Rahane Statement)
रहाणेने पुढे सांगितले की, “मी खरं सांगायचं तर कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी निवडकर्त्यांशी बोललो देखील होतो, पण मला यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मी फक्त हेच करू शकतो की मी सतत खेळत राहावे. मला कसोटी क्रिकेट खूप आवडते. मला लाल चेंडूसोबत खेळायला खूप आवडते.” (Ajinkya Rahane Statement)
अजिंक्य रहाणे सध्या देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने मुंबईचे कर्णधारपद भूषवले आणि संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले. रहाणेने रणजी ट्रॉफीमध्ये 9 सामन्यांत 467 धावा केल्या. (Ranji Trophy Rahane) पण रणजीतील या उत्कृष्ट कामगिरीनंतरही त्याला संघात स्थान मिळाले नाही. 37 वर्षीय हा खेळाडू अजूनही कसोटी क्रिकेट खेळण्यात स्वारस्य दाखवत आहे. रहाणेने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबत अजून विचार केलेला नाही.
अजिंक्य रहाणेने भारतासाठी आतापर्यंत 85 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 38.46 च्या सरासरीने 5077 धावा केल्या आहेत. आपल्या या कारकिर्दीत रहाणेने 12 शतकांसह आणि 16 अर्धशतके झळकावली आहेत. (Ajinkya Rahane stats)





