---Advertisement---

‘निर्णय माझे आणि क्रेडिट दुसऱ्यांनीच घेतले’; कायमचा संघाबाहेर होण्याच्या वाटेवर असलेला रहाणे संतापला

On: गुरूवार, फेब्रुवारी 10, 2022 5:09 PM
ajinkya-rahane-test
---Advertisement---

भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या कसोटी कारकिर्दीवर संकट आले आहे. रहाणेला रणजी करंडक स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. परंतु यानंतर होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. यामागचे कारण आहे, मागील काही सामन्यांमधील त्याची खराब कामगिरी. तो ज्या पद्धतीचा फलंदाज म्हणून ओळखला जातो, तो सध्या त्या पद्धतीची कामगिरी करत नाहीय. यामुळेच कसोटी संघातील त्याच्या स्थानावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या कारणामुळे त्याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील त्याच्या कामगिरीनंतर लोक रहाणेवर प्रचंड टीका करत आहेत. यावर रहाणेने त्याच्या टिकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. रहाणेला वाटते की त्याची कारकिर्द संपणार इतक्यातच नाही. त्याने लोकांकडून होणऱ्या टीकांना उत्तर देत एक मोठे विधान केले आहे. जे लोक खेळ चांगल्याप्रकारे समजतात ते असा विचार करत नाहीत.

रहाणे ‘बॅकस्टेज विथ बोरिया’ या कार्यक्रमात ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे उदाहरण देत म्हणाला की, “जेव्हा मला लोक म्हणतात की तुझी कारकिर्द संपली तेव्हा मी हसतो. ज्यांना खेळ समजतो ते अशाप्रकारे बोलत नाहीत. ऑस्ट्रेलियात जे झाले आणि त्याअगोदरचे माझे क्रिकेटमधील योगदान सर्वांनाच माहित आहे. ज्या लोकांना खेळाप्रती प्रेम आहे तेच समजून घेण्याच्या गोष्टी बोलतात.

ऑस्ट्रलिया दौऱ्यादरम्यान पहिला सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर माजी कर्णधार विराट कोहली आपल्या पहिल्या मुलीच्या जन्मामुळे भारतात परतला होता. त्यामुळे राहणेने संघाचे नेतृत्व केले आहे आणि मेलर्बन येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात शतक झळकावून संघात पुनरागमन केले होते. तिथेच भारताने मालिकेवर कब्जा केला होता.

रहाणे म्हणाला की, “ऑस्ट्रलियामध्ये मी काय केले हे मला माहित आहे. मला कोणाला सांगायची गरज नाही. मला श्रेय घेण्याची सवय नाही. हा काही गोष्टींचे निर्णय मी मैदानात घेतले आणि काही ड्रेसिंग रुममध्ये निर्णय घेतले. परंतु या सगळ्याचे श्रेय दुसऱ्यांनाच मिळाले. आम्ही मालिका जिंकलो हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. यानंतर लोकांच्या काय प्रतिक्रीया होत्या किंवा लोकांना नंतर काय सांगितले गेले, जे नंतर सोशल माध्यमांवर आले की हे आम्ही केले, हा आमचा निर्णय होता, हे त्यांचे बोलणे होते. परंतु मी काय निर्णय घेतले हे मला माहित आहे.

नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या कसोटी मालिकेत रहाणे यशस्वी ठरला नाही. त्याने फक्त एक अर्धशतक लगावले होते. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या सामन्यात त्याने हे अर्धशतक लगावले होते. सेंचुरियन कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ४८ धावा केल्या. त्याने तीन सामन्यात १३६ धावा केल्या. यानंतरच लोकांकडून त्याच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

दक्षिण आफ्रिकी कर्णधाराच्या मनात आयपीएलविषयी आहे कटूता; म्हणे, ‘मी पैशापेक्षा जास्त क्रिकेटला महत्त्व देतो’

कर्णधार रोहितचा विजयरथ सुस्साट; कमी वेळातच कोहली, कपिल देव यांना मागे सोडत बनला ‘एक नंबर’

विराटने भन्नाट झेल टिपल्यानंतर ‘हिटमॅनने’ दिलेली रिॲक्शन सोशल मीडियावर होतेय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---