भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे. या मालिकेत सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात विजयाची नोंद करण्याकडे भारताचे लक्ष लागले आहे. भारताने गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियात चमकदार कामगिरी केली आहे. 2014 पासून एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. 2018-19 आणि 2020-21 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय नोंदवले होते. या मालिकेतही अशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याकडे टीम इंडियाचे लक्ष असेल.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणांमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीमसोबत गेलेला नाही. अशा स्थितीत पहिल्या कसोटी सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असला तरी संघातील इतर खेळाडू हे आव्हान स्वीकारण्यास तयार आहेत. मागच्या दौऱ्यातही भारताचा नियमित कर्णधार संपूर्ण मालिकेत संघासोबत नव्हता. 2020-21 मध्ये, विराट कोहली कौटुंबिक कारणांमुळे दौऱ्याच्या मध्यभागी भारतात परतला होता.
आतापर्यंत केवळ सहा भारतीय कर्णधारांना ऑस्ट्रेलियात विजयाची नोंद करता आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीला याठिकाणी एकही कसोटी सामना जिंकता आला नाही. आणखी एक मनोरंजक तथ्य म्हणजे विराट कोहली, सौरव गांगुली किंवा सुनील गावस्कर नाही तर अजिंक्य रहाणे हा ऑस्ट्रेलियातील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाला एकाही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला नाही. त्याने संघाला मालिकेतही विजय मिळवून दिला आहे.
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या कर्णधारांमध्ये तीन खेळाडूंचा समावेश आहे. अजिंक्य रहाणे, विराट कोहली आणि बिशन सिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात 2-5 कसोटी सामने जिंकले आहेत. सुनील गावस्कर, सौरव गांगुली आणि अनिल कुंबळे कर्णधार असताना भारताने तिथे 1-1 असा विजय मिळवला आहे.
10 कसोटी सामने गमावल्यानंतर भारताला ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिला विजय मिळाला. हे साध्य करण्यासाठी 30 वर्षे लागली. वास्तविक, भारतीय संघ 1947 मध्ये पहिल्यांदा तिथे कसोटी सामना खेळला आणि 1977 मध्ये पहिला विजय मिळवला. त्यावेळी भारताचे कर्णधार बिशनसिंग बेदी होते.
ऑस्ट्रेलियातील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार
कर्णधार सामने जिंकले पराभव ड्रॉ विजय टक्केवारी
अजिंक्य रहाणे 3 2 0 1 66.67
विराट कोहली 7 2 3 2 28.57
बिशनसिंग बेदी 5 2 3 0 40.00
सुनील गावस्कर 3 1 1 1 33.33
हेही वाचा-
न भूतो न भविष्यति! रोहित शर्माने आजच्याच दिवशी खेळली होती वनडे इतिहासातील सर्वोच्च खेळी!
वरुण चक्रवर्तीकडे अश्विनचा मोठा विक्रम मोडण्याची संधी, इतक्या विकेट्स घेऊन रचणार इतिहास
“तो चिडखोर स्वभावाचा…”, गौतम गंभीरच्या वक्तव्यावर रिकी पाँटिंगचा शाब्दिक हल्ला