इंडयिन प्रीमियर लीगच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने रविवारी (११ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल २०२० चा पहिला सामना खेळला. मात्र या सामन्यात त्याला जास्त चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
या सामन्यात युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्ली संघाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी निवडली. त्यामुळे पृथ्वी शॉ आणि शिखर धवन सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. पण पहिल्या षटकातच मुंबईच्या ट्रेंट बोल्ट आणि कृणाल पंड्याने मिळून शॉला झेलबाद केले. त्यानंतर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने रहाणेला फलंदाजीसाठी पाठवले.
रहाणेनेही आपल्या पहिल्याच सामन्यातील पहिल्या षटकात चौकार मारत चांगली फलंदाजी करायला सुरुवात केली. पण पुढे ५व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या कृणालने त्याला पायचित केले. त्यामुळे रहाणे १५ चेंडूत केवळ १५ धावा करत बाद झाला.
Ajinkya Rahane After Sitting At Pavillion And Getting No Chance To Play : pic.twitter.com/x0FoJHG8qy
— Himanshu Chourasia 🌟🦀🍀 (@Rain_Man25) October 11, 2020
@ajinkyarahane88 You do not deserve to play with Team India. Now you play on behalf of Italy cricket team. You will also find your rhythm. @italiacrickettv
— Anil Sahni Gorakhpur (@Anilsahnigkp) October 11, 2020
— ️️` (@WeirddTweetz) October 11, 2020
https://twitter.com/dhoni_srk28/status/1315298501547290625?s=20
https://twitter.com/ItzSaiKiran/status/1315298424057593856?s=20
Go to chennai @ajinkyarahane88 , they just want some runs, doesn't matter at what rate they come
— Charan (@charanjd75) October 11, 2020
@ajinkyarahane88 kaise bi out hona pr fraud pandya brothers ko kbhi wkt mt dena bro 💉 https://t.co/P6RyaQQXDI
— Prateek (@PrateekRobot) October 11, 2020
Ajinkya Rahane is another overrated IPL player who doesn't score runs quite often
When he scores, he puts team.under pressure by playing slow ! RR fans know very well about him#MIvDC #DCvMI— Aman (@CricketSatire) October 11, 2020
दिल्ली संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्यासाठी प्रतिक्षेत असलेला रहाणे त्याला मिळालेल्या संधीचे सोने करु शकला नाही. म्हणून चाहत्यांनी त्याला ट्विटरवर ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-तेवतिया आणि राजस्थान संघाच नातं आहे खूपच खास, असं आम्ही नाही आकडेवारी सांगतेय
-व्वा रे मुंबईकर! दिल्लीविरुद्धचा सामना रोहित शर्मासाठी ठरला खूपच ‘खास’, कसं ते पाहा
-राजस्थानच्या विजयानंतर तेवतिया आणि खलीलमध्ये चांगलीच जुंपली; पुढे काय झाले पाहाच
ट्रेंडिंग लेख-
-वाढदिवस विशेष.! क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा दर्दी ‘महानायक’
-आयपीएल २०२० : ‘या’ तीन संघांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित
-आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ