उपकर्णधार अजिंक्य रहाणेने न्यूझीलंडमध्ये साधला मराठीतून संवाद, पहा व्हिडिओ

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून (Tour of New Zealand) न्यूझीलंड विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी गुरुवारी (20 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत रहाणेने ज्येष्ठ पत्रकार सुनंदन लेले (Sunandan Lele)  यांच्याशी मराठी भाषेत संवाद साधला.

यावेळी तो क्वीन्सटाऊन (Queenstown) लेक (तलाव) बरोबरच न्यूझीलंडचे पर्यटनाबद्दल बोलताना दिसून आला.

रहाणेचा हा व्हिडिओ ईएसपीएन क्रिकइन्फोने शेअर केला आहे. या व्हिडिओत रहाणे ज्येष्ठ पत्रकार लेले (या व्हिडिओत दिसत नाहीत) यांच्याशी चर्चा करत आहे. यावेळी न्यूझीलंडच्या सुंदरतेबद्दल रहाणे लेलेंशी मराठीत बोलला.

‘कुठे आहात तूम्ही? हा व्हिडिओ…तो व्हिडिओ… क्वीन्सटाऊन लेक (तलाव) हे खूप सुंदर आहे. न्यूझीलंडचा परिसरही अप्रतिम आहे. तेथील खरी मजा ही आपल्या मुलीबरोबर सकाळी कॉफी पिण्यात आहे,’ असे रहाणे बोलताना दिसत आहे.

त्याचबरोबर हा संवाद झाल्यानंतर कोणीतरी पाठीमागून म्हणाले की, “आणि तसेच पोहेही.” या वाक्यानंतर खोलीमधील संपूर्ण वातावरण हास्यमय झाले होते.

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामना आजपासून सुरु झाला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 5 बाद 122 धावा केल्या.

तसेच पहिल्या दिवसाखेर रहाणे नाबाद 38 धावांवर खेळत आहे. तर, रिषभ पंत नाबाद 10 धावांवर खेळत आहे. इतर खेळाडूंपैकी मयंक अगरवाल (34), पृथ्वी शॉ (16) आणि चेतेश्वर पुजाराने (11) धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीला मात्र दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही आणि तो 2 धावांवर झेलबाद झाला.

You might also like