अगदी सहा महिन्यांपर्यंत भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधर असलेला अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खराब कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मागील जवळपास दीड वर्षातील सातत्याच्या अभावानंतर भारतीय निवडसमितीने हा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय संघातून आगमन करण्याचा निश्चय पुन्हा एकदा रहाणेने केलेला आहे. त्याचाच भाग म्हणून त्याने एका महत्त्वाच्या स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर येत आहे.
सप्टेंबर महिन्यात भारतीय क्रिकेटच्या नव्या हंगामाला सुरुवात होतेय. ८ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या काळात दुलीप ट्रॉफी खेळली जाईल. साखळी फेरीचे सामने चेन्नई येथे खेळले जातील. तर, अंतिम सामन्याचे यजमानपद कोइंबतूर भूषवेल. पुन्हा एकदा विभागीय पद्धतीने होणाऱ्या दुलीप ट्रॉफीत खेळण्याचा निर्णय अजिंक्य रहाणेने घेतला आहे.
एका प्रमुख वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अजिंक्य रहाणे यावर्षी दुलीप ट्रॉफीत खेळताना दिसेल. पश्चिम विभागाच्या संघात खेळण्यासाठी आपण उपलब्ध असल्याचे त्याने निवड समितीला सांगितले आहे. यावर्षी दुलीप ट्रॉफीत पुन्हा एकदा पहिल्या पाच संघांसह नॉर्थ ईस्ट संघ सहभागी होईल.
अजिंक्य रहाणे याने आतापर्यंत भारतीय संघासाठी ८२ कसोटीत ३८.५२ च्या सरासरीने ४९३१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १२ शतके ठोकली आहेत. विराट कोहलीच्या उपस्थितीत त्याने अनेक वेळा भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले आहे. भारतीय संघाने २०२०-२०२१ मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी रहाणेच्याच नेतृत्वात केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘एशिया क्रिकेटचे माहेरघर, शारजाह क्रिकेट स्टेडियम’, टीम इंंडियाशी आहे खास कनेक्शन
तिसऱ्या वनडेत पुण्याचा ऋतुराज घेणार गब्बरची जागा!, वाचा काय आहे कारण
विराट-धोनी नाही, तर ‘या’ दोघांमुळे चहल आज भारताचा नंबर १ स्पिनर, स्वतःच दिले स्पष्टीकरण