---Advertisement---

VIDEO: ‘ऋतुराजला आवडत नाही महेंद्रसिंग धोनी!’ स्वत: सांगितले त्याचे आवडते ३ खेळाडू

---Advertisement---

सध्या भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने एकतर्फी जिंकत केएल राहुलच्या नेतृत्वातील भारतीय संघाने मालिका आपल्या नावे केली आहे. आता मालिकेतील अखेरचा सामना जिंकून मालिका ३-० अशा फरकाने खिशात घालण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करेल. तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने एक मुलाखत दिली. त्यात त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

बीसीसीआयने नुकताच आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ऋतुराज विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसतोय. या मुलाखती त्याला सर्व प्रश्न अगदी रोजच्या जीवनाशी निगडित विचारण्यात आले. पुण्यातील कोणता पदार्थ सर्वात जास्त खायला आवडतो असे विचारल्यानंतर, ऋतुराजने डोसा हे उत्तर दिले. क्रिकेटर नसता तर तू दुसऱ्या कोणत्या खेळात कारकीर्द केली असती, असे विचारल्यानंतर त्याने टेनिस म्हटले. रॉजर फेडरर व राफेल नदाल यापैकी त्याने फेडररला पसंती दिली.

https://www.instagram.com/reel/ChhnrdUD2Ur/?igshid=YmMyMTA2M2Y=

 

वेगवान गोलंदाजांना खेळायला आवडते की फिरकी गोलंदाजांना या प्रश्नावर त्याने वेगवान गोलंदाज असे उत्तर दिले. कोणत्या मैदानावर कसोटी पदार्पण करायला आवडेल असे विचारले असता त्याने ऐतिहासिक लॉर्ड्सचे नाव घेतले. आतापर्यंतचे सर्वात आवडते मैदान म्हणून त्याने चेन्नईच्या चेपॉकच्या पारड्यात आपले वजन टाकले. आपला आवडता फलंदाजी साथीदार म्हणून त्याने युवा ईशान किशनचे नाव घेतले. तर, आपले आजवरचे आवडते क्रिकेटपटू म्हणून सचिन तेंडुलकर, विराट कोहली व रोहित शर्मा यांना त्याने पसंती दिली.

ऋतुराज भारतासाठी टी२० क्रिकेट खेळला असला तरी, त्याला वनडे पदार्पणासाठी वाट पहावी लागत आहे. झिम्बाब्वेविरूद्धच्या अखेरच्या सामन्यात त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या- ‌

‘एशिया क्रिकेटचे माहेरघर, शारजाह क्रिकेट स्टेडियम’, टीम इंंडियाशी आहे खास कनेक्शन

तिसऱ्या वनडेत पुण्याचा ऋतुराज घेणार गब्बरची जागा!, वाचा काय आहे कारण

विराट-धोनी नाही, तर ‘या’ दोघांमुळे चहल आज भारताचा नंबर १ स्पिनर, स्वतःच दिले स्पष्टीकरण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---