---Advertisement---

विराट-धोनी नाही, तर ‘या’ दोघांमुळे चहल आज भारताचा नंबर १ स्पिनर, स्वतःच दिले स्पष्टीकरण

Yuzvendra-chahal,-Virat-Kohli
---Advertisement---

युझवेंद्र चहल भारतीय क्रिकेट संघाचा एक प्रमुख गोलंदाज आहे. त्याने अनेक सामन्यांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडत संघाला विजय मिळवून दिला आहे. मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकात चहलला संधी मिळाली नव्हती आणि यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. असे असले तरी, चहलने त्यानंतर संघात जोरदार पुनरागमन केले आहे. संघात पुनरागमन करण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मदत केली, असे चहलला वाटते. 

युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने त्याला मिळालेल्या यशाचे श्रेय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना दिले. एका यूट्यूब चॅनलवर बोलताना यहल म्हणाला की, “रोहित भाई मला म्हटला होता की, यावर्षी आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी तुला पॉवरल्येमध्ये आणि शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करावी लागू शकते.” चहलच्या मत राहित नेहमीच त्याला वेगवेगळे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देत असतो. जेव्हा भारतीय संघ फलंदाजी करत असतो, तेव्हाही रोहित अनेक विषयांवर चर्चा करत असतो. त्याच्या या सर्व गुणांमुळे एक चांगला गोलंदाज बनण्यासाठी चहलला खूप मदत झाली, असे गोलंदाज स्वतः म्हटला आहे.

“रोहित भाईने मेहमीच मला एका विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या रूपात वापरले आहे. मला त्याच्याकडून खूप जास्त मोकळीक मिळाली आहे, ज्याची अपेक्षा प्रत्येक गोलंदाजाला कर्णधाराकडून असते,” असेही चहल पुढे बोलताना म्हणाला. त्याव्यतिरिक्त चहलला प्रशिक्षक राहुल द्रविडचे देखील मार्गदर्शन देखील वेळोवेळी मिळाले आहे.

दरम्यान, भारतीय संघाला सोमवारी (२२ ऑगस्ट) झिम्बाब्वेविरुद्धचा तिसरा आणि शेवटचा सामना खेळायचा आहे. चहल या दौऱ्यात भारतीय संघासोबत नाहीये. परंतु २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकात मात्र त्याला संघाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. भारताला आशिया चषकातील पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्या पोहोचला थेट शहांच्या दारी, श्रीलंका क्रिकेटची स्थिती सुभारण्यावरून झाली विशेष चर्चा
तिसऱ्या वनडेत पुण्याचा ऋतुराज घेणार गब्बरची जागा!, वाचा काय आहे कारण
पाकिस्तानी कर्णधाराचा आणखी एक विक्रम! नेदरलँडविरुद्ध एकेरी खिंड लढवत रचला इतिहास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---