आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021-23चा अंतिम सामना जुन महिन्यात खेळला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ या सामन्यात आमने सामने असून 7 ते 11 जुनदरम्यान हा सामना इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर पार पडेल. भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याला मोठ्या काळानंतर या सामन्यातून संघात पुनरागमनाची संधी मिळाली आहे. आगामी काळात खेळल्या जाणाऱ्या वनडे विश्वचषकासाठीही रहाणेने दावा ठोकला आहे.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी मालिका जिंकली आहे. मात्र मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात त्याने आपला शेवटचा कसोटी सामना दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळला. तेव्हापासून मागच्या जवळपास एक ते दीड वर्षात त्याला एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाहीये. यावर्षी मार्च महिन्यात बीसीसीआयने खेळाडूंचे वार्षीक करार घोषित केले. पण रहाणेला मात्र यावर्षी बीसीसीआयचा करार देखील मिळाला नाही. असे असले तरी, सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये रहाणे जबरदस्त स्ट्राईक रेटने धावा करत आहे.
यावर्षी सीएसकेसाठी त्याने हंगामातील पाच सामन्यांमध्ये 52.25च्या सरासरीने 209 धावा साकारल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 199.04 राहिला आहे. आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करत असतानाच मंगळवारी (25 एप्रिल) रहाणेसाठी एक आनंदाची बातमी आली. त्याला डूब्लूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी भारताच्या 15 सदस्यीय संघात निवडले गेले. त्याचा फॉर्म पाहता रहाणेला हा महत्वाचा सामन्याची खेळण्याची संधी मिळण्याचीही दाट शक्यता आहे. डब्लूटीसीच्या अंतिम सामन्यासह रहाणेने आघामी वनडे विश्वचषकासाठीही दावा ठोकला आहे.
भारतीय संघासाठी वनडे विश्वचषकादरम्यान श्रेयस अय्यर महत्वाची भूमिका पार पाडू शकत होता. मात्र, मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळताना त्याला दुखापत झाली. नुकतीच त्याच्या पाठीची शस्त्रक्रिया झाली असून पुढे काही महिने त्याला विश्रांती सांगितली गेली आहे. अय्यरच्या जागी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सूर्यकुमार यादवला संघ व्यवस्थापनाकडून संधी दिली गेली होती. मात्र, सूर्यकुमार या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला होता. याच पार्श्वभूमीवर सध्या फॉर्ममध्ये असणाल्या रहाणेलाला वनडे विश्वचषकात संघ व्यवस्थापनाकडून संधी दिली जाऊ शकते. रहाणेच्या रूपात संघाला मध्यक्रमात एक अनुभव फलंदाज मिळेल, जो विश्वचषक देखील जिंकवून देऊ शकतो.
असे असले तरी, भारतीय संघाला वनडे विश्वचषाच्या आधी वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध वनडे मालिका खेलायची आहे. सोबतच विश्वचषाच्या आदीत आशिया चषक देखील आयोजित केला जाणार आहे. दरम्यानच्या काळात श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव वनडे विश्वचषकासाठी संघात पुनरागमन करू शकतात. पण अजिंक्य रहाणेलाही यादरम्यान चांगली प्रदर्शन करून आपली दावेदारी कायम ठेवावी लागेल. (Ajinkya Rahane ready for the World Cup! A chance can be found for ‘this’ reason)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आता विराट धावा करण्यासाठी झगडणार…’, एका वक्तव्यामुळे अनन्या पांडे ट्रोल
RCBvsKKR । विजयकुमार वैशाकच्या घातक यॉर्करवर केकेआरचा सेट खेळाडू त्रिफळाचीत । पाहा VIDEO