22 नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर बांगलादेशविरूद्ध दिवस- रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ सज्जा झाला आहे. हा कसोटी सामना दिवस-रात्र असल्याने या सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर होणार आहे.
या सामन्यासाठी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेही तयारीला सुरुवात केली आहे. त्याने नुकताच गुलाबी चेंडूबरोबरचा एक फोटो इंस्टाग्रामला शेअर केला आहे. हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे रहाणेच्य या फोटोवर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि सलमीवीर फलंदाज शिखर धवनेने प्रतिक्रिया दिली आहे.
https://www.instagram.com/p/B5AcA3ahWN0/
रहाणेने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दिसते की तो गुलाबी चेंडूच्या शेजारी झोपला आहे. या फोटोला रहाणेने कॅप्शन दिले आहे की ‘गुलाबी चेंडूने दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याचे स्वप्न आत्तापासूनच पडत आहेत.’
रहाणेच्या या फोटोवर विराटने प्रतिक्रिया दिली आहे की ‘मस्त फोटो जिंक्सी.’ तसेच शिखरने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की ‘स्वप्नात फोटो काढला का?’

यावर रहाणेने शिखरला उत्तर देताना म्हटले आहे की ‘स्वप्नांमध्ये नाही जवळच्या व्यक्तीने काढला आहे.’

रहाणे सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने बांगलादेश विरुद्ध इंदोरला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 172 चेंडूंत 86 धावांची शानदार खेळी केली होती.
या सामन्यानंतर आता 22 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश संघात सुरु होणारा दिवस-रात्र कसोटी सामना भारताचा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना असल्याने ऐतिहासिक ठरणार आहे.
या सामन्यासाठी कोलकातामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच या सामन्यासाठी दोन्ही संघ मेहनत घेत आहेत.
तसेच, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) यांच्या हस्ते या सामन्याचा शुभंकर(Mascots) ‘पिंकू-टिंकू’ (Pinku-Tinku)चे अनावरणही करण्यात आले आहे. गांगुलीने ईडन गार्डनवर सामन्याचे तिकीट आणि शुभंकर बरोबर फोटो घेतले.
या खेळाडूसाठी युवराज सिंग करणार शाहरुख खानला मेसेज
वाचा????https://t.co/hTx4lmKf43????#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 19, 2019
या खेळाडूने केले अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक करत रचला मोठा विक्रम
वाचा????https://t.co/LrcN9Wg3g6????#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) November 19, 2019






