विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आता अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ या अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी झुंज देतील. १८ ते २२ जून दरम्यान हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जाईल. या सामन्यात क्रिकेटच्या सर्वोत्तम प्रकाराचा पहिला जगज्जेता क्रिकेट विश्वाला मिळेल.
दोन्ही संघांनी हे विजेतेपद आपल्याकडे यावे, यासाठी कसून सरावाला सुरुवात केली आहे. न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आपल्या तयारीची चाचपणी केली. तर भारतीय संघ साउथम्पटनच्या मैदानात कधी इंट्रा-स्क्वाड सामन्यातून तर कधी नेटमधील सरावातून तयारी करतो आहे. या सरावाचे विविध व्हिडिओ देखील आता समोर येत आहेत.
उपकर्णधार अजिंक्य रहाणेची जय्यत तयारी
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या सरावाचा असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. खुद्द रहाणेनेच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो नेटमध्ये कसून सराव करतांना दिसून येत आहे.
व्हिडिओत दिसत असलेला पहिला चेंडू रहाणे सोडून देणे पसंत करतो आहे. तर दुसर्या चेंडूवर तो फ्रंटफूट डिफेन्स करतो आहे. त्याच्या पुढच्या चेंडूवर स्क्वेअर कट मारून त्याने आपल्या भात्यात विविध अस्त्र असल्याचे दाखवून दिले आहे. अजिंक्य रहाणेने या व्हिडिओला ‘अंतिम सामन्यापूर्वी सगळया मूलभूत गोष्टी अचूक पारखून घेण्याचा प्रयत्न’, असे कॅप्शन पण दिले आहे.
Getting the basics right ahead of the game pic.twitter.com/LrSmPZ9oZu
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) June 14, 2021
अंतिम सामन्यात रहाणेची भूमिका महत्वाची
दरम्यान, कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवायचा असेल तर अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीची भूमिका महत्वाची असेल. इंग्लिश वातावरणात वेगवान गोलंदाज मदत मिळते आणि न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाजाचे आक्रमण अतिशय मजबूत आहे. त्यांचा समर्थपणे सामना करण्यासाठी भारताला तांत्रिकदृष्ट्या अचूक फलंदाज असलेल्या रहाणेची गरज भासेल. त्यामुळे अंतिम सामन्यात रहाणे ही भूमिका पार पाडून भारताला पहिलेवहिले विजेतेपद पटकावून देणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या:
क्षणभर विश्रांती! श्रीलंका दौऱ्याआधी हार्दिक पंड्या घेतोय कौटुंबिक सहलीची मजा, पाहा फोटो
बेन स्टोक्स- हेडिंग्ले ते रिषभ पंत- गाबा! वाचा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वोत्तम खेळींच्या आठवणी
धोनी चित्रपटाची तयारी करताना सुशांतची फ्रक्चर झाली होती २ बोटं, कोच हातात काठी घेऊन…