भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्स संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या त्याच्या आक्रमक खेळीमुळे अनेकदा चर्चेत असतो. त्याचबरोबर त्याची त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेकदा चर्चा होत असते. नुकताच तो अशाच एका कारणामुळे चर्चेत आला आहे. सतत क्रिकेट सामने खेळण्यात व्यस्त असल्याने कुटुंबियांना वेळ देता येत नसल्यामुळे हार्दिक पांड्या आणि त्याचे सर्व कुटुंब फिरायला गेले आहे. यादरम्यानचा त्याचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
चार्टर्ड विमानाने केलेला प्रवास
वैयक्तिक चार्टर्ड विमानाने हार्दिक पंड्याच्या कुटुंबाने प्रवास केला आहे. हार्दिकसोबत त्याची पत्नी नताशा स्टेनकोवीच आणि मुलगा अगस्त्य दिसून आले आहेत. हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल आणि हार्दिकची वहिनी पंखुडी शर्मा आणि त्यांचे काही मित्रपरिवार देखील त्यांच्यासोबत आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी दोघा भावांची निवड
हार्दिक आणि कृणाल दोघेही भाऊ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. 13 जुलै पासून सुरु होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाला तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. या दोन्ही मालिकांसाठी हार्दिक आणि कृणाल या दोघांची निवड झाली आहे.
भारताचा कसोटी संघ सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर गेलेला आहे. भारतीय संघाला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 18 जून पासून विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळायचा आहे. भारताच्या संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेले आहेत. तर भारताचा मर्यादीत षटकांचा संघ 13 जुलैपासून श्रीलंका दौऱ्यावर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. (Hardik Pandya’s vacation ahead of Sri Lanka tour, taking time out of busy life to travel with family)
श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
महत्त्वाच्या बातम्या –
बेन स्टोक्स- हेडिंग्ले ते रिषभ पंत- गाबा! वाचा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वोत्तम खेळींच्या आठवणी
धोनी चित्रपटाची तयारी करताना सुशांतची फ्रक्चर झाली होती २ बोटं, कोच हातात काठी घेऊन…
कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियाला ‘या’ ६ न्यूझीलंडच्या खेळाडूंपासून आहे सर्वाधिक धोका