भारताची वेस्ट इंडिजविरुद्धची दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने आपला सराव करतानाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
राजकोट येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी सराव करताना रहाणेने चांगलाच घाम गाळला. त्यामधून त्याने आगामी मालिकेसाठी आपण सज्ज होत आहोत असा संदेश त्याने दिला आहे.
https://www.instagram.com/p/BoVnH7zB2D-/?utm_source=ig_web_copy_link
इंग्लड दौऱ्यात फारशी चांगली कामगिरी न करू शकला नव्हता. या मालिकेत 5 सामन्यात 81 या आपल्या सर्वोच्च धावसंख्येसह त्याने 10 डावात 257 धावा केल्या होत्या. त्यात त्याच्या दोन अर्धशतकांचा समावेश होता.
त्यानंतर रहाणेने विजय हजारे ट्रॉफीत मुंबईकडून खेळातना 79,148 आणि 3 धावा केल्या होत्या. त्याच्याकडून ह्या मालिकेत चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.
रहाणेने आपल्या कसोटी कारकीर्दीत 3100 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च खेळी 188 असून त्याने 9 शतक तर 14 अर्धशतक झळकावले आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला 4 ऑक्टोबरपासून राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भारताचा महान गोलंदाज झहीर खान करतोय पुनरागमन
–विंडिज विरुद्ध कोहलीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; काय आहे कारण जाणून घ्या
–टी-20 विश्वचषकापुर्वी इंग्लंडला मोठा धक्का, सारा टेलर संघातून बाहेर