भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आता पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये परतत आहे, यंदा तो खेळाडू म्हणून नाहीतर समालोचक म्हणून. याची सुरूवात तो श्रीलंका दौऱ्यातून करणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. 15 ऑगस्टपासून सुरू होणारी ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 चा भाग आहे. या मालिकेदरम्यान रहाणे समालोचनात पदार्पण करणार आहे.
या कसोटी मालिकेचे थेट प्रेक्षपण सोनी नेटवर्कवर होणार आहे. यावेळी रहाणे समालोचन पॅनेलचा भाग असणार आहे.
“श्रीलंका दौऱ्यावर कसोटी समालोचनात पदार्पण करण्यास मी उत्सुक आहे. कसोटी क्रिकेट हा आपल्या खेळाचा सर्वोच्च स्तर आहे. इतकी वर्षे या फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, आता तोच खेळ एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे हे माझ्यासाठी एक सौभाग्य आहे,” असे रहाणेने त्याच्या समालोचनाच्या पदार्पणाबाबत म्हटले आहे.
18 वर्षांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीनंतर रहाणेची नवी सुरूवात
रहाणेने जवळपास 18 वर्ष प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. या मोठ्या कारकिर्दीला पूर्णविराम दिल्यानंतर तो आता समालोचकाच्या नव्या भुमिकेत दिसणार आहे. तो मैदानावर नाहीतर स्टुडिओमधून त्याच्या पाच दिवसांच्या या सामन्यांचे विश्लेषण करणार आहे.
रहाणेची कारकिर्द
ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकणाऱ्या दोन कर्णधारांपैकी एक असणाऱ्या रहाणेने त्याच्या कारकिर्दीत 85 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने 12 शतके आणि 26 अर्धशतकांच्या सहाय्याने 5077 धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2020-21 ऑस्ट्रेलियामध्ये लक्षवेधी कामगिरी केली होती.
त्या मालिकेतील पहिल्या कसोटीमध्ये भारत 36 धावसंख्येवर सर्वबाद झाला होता, तेव्हा उर्वरित मालिकेत भारताने नेतृत्व रहाणेने केले होते. नियमित कर्णधार विराट कोहली मुलाच्या जन्मावेळी बाकी मालिकेत खेळला नाही. तो आपल्या कुटुंबाकडे परतला होता. पुढच्या कसोटीमध्ये (मेलबर्न) रहाणेने शतकी खेळी केली होती आणि भारताच्या विजयाचा पाया रचला होता. ती बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारताने जिंकली होती. (Ajinkya Rahane will be doing commentary on Sony Network during India vs Sri Lanka Test series)






