येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ (Indian premiere league) स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी मेगा ऑक्शन (ipl Mega auction) सोहळा पार पडणार आहे. या मेगा ऑक्शनमध्ये अनेक दिग्गज खेळाडू खेळताना दिसून येणार आहेत. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आगामी हंगामासाठी एका अशा खेळाडूच्या शोधात असणार आहे, जो संघाचे नेतृत्व करू शकेल. दरम्यान या मेगा ऑक्शनपूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटूने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला मोलाचा सल्ला दिला आहे.
स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या ‘गेम प्लॅन’ या शोमध्ये बोलताना माजी भारतीय क्रिकेटपटू अजित आगरकरने (Ajit agarkar) म्हटले की, “जर विराट कोहली (Virat Kohli) संघाचे नेतृत्व करत असेल आणि असे करून तो खुश असेल तर ही संघासाठी समाधानकारक बाब असेल. आपण पाहिले आहे की, गेल्या काही वर्षात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १२,१३ किंवा १४ खेळाडूंचा चांगला संघ बनवण्यासाठी योग्य बोली लावली नाहीये. हा संघ नेहमीच सुरिवातीच्या तीन खेळाडूंवर अवलंबून राहिला आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “या संघातील मध्यक्रमात सामना जिंकून देणारे खेळाडू नाहीये. जर तुमच्याकडे पैसा नाहीये, तर तुम्ही असं करू शकत नाही. जर तुम्ही एखाद्या खेळाडूवर जास्तीची बोली लावत असाल तर तो खेळाडू तुम्हाला सामना जिंकून देऊ शकतो स्पर्धा जिंकून देऊ शकत नाही.”
“सर्व फ्रँचायजींना भविष्यासाठी संघ निवडायचा आहे. जुने संघ केवळ आपल्या ४ खेळाडूंना रिटेन करण्यात सक्षम आहेत. मुंबई इंडियन्स संघाकडे जास्त विकल्प होते. त्यांना ४ पेक्षा अधिक खेळाडूंना रिटेन करायचे होते. मात्र एक गोष्ट आहे,या मेगा ऑक्शनमध्ये स्पर्धा या गोष्टीची असणार आहे की,कोण भारतातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंना आपल्या संघात स्थान देणार.”
महत्वाच्या बातम्या :
‘बापमाणूस’ गेल्याने सुरेश रैना भावुक, वडिलांच्या निधनानंतर सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट
“जर तुम्ही चांगले व्यक्ती असाल तर लोक जवळ करतील आणि..” वाचा असे का म्हणाला विराट कोहली