दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पराभवानंतर भारत मायदेशात वेस्ट इंडीजविरुद्ध(IND vs WI) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. रविवारी पहिला सामना भारताने जिंकला आणि बुधवारी (०९ फेब्रुवारी) या दोन संघांमध्ये दुसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ५ धावा करुन परतला आहे.
त्याने या सामन्यासाठी सलामीवीर म्हणून रिषभ पंतची( rishabh pant) निवड केली होती. तर उपकर्णधार केएल राहुल मधल्या स्थानी फलंदाजीला पाठवले होते. तत्पूर्वी भारताचा माजी खेळाडू अजीत अगरकर याने एकदिवसीय मालिकेबद्दल एक भविष्यावाणी केली आहे.
अजित आगरकर म्हणाले होते की, “भारतीय संघ व्यवस्थापनाने फलंदाजांचे क्रमांक ठरवले पाहिजेत. कोणता फलंदाज कधी फलंदाजीला येणार हे अगोदरच निश्चित करायला हवे. जर केएल राहुल मधल्या फळीत फलंदाजी करणार असेल तर त्याला २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत मधल्या फळीतच खेळवायला हवे. तरच संघाचा समतोल टिकून राहिल. आत्तापासूनच फलंदाजांच्या मनात आपल्या भूमिका असायला हव्या की कोणता खेळाडू कोठे खेळणार. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या ठिकाणी भारताकडे मोठे फटके खेळणारे खेळाडू असायला हवेत.”
तसेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसंदर्भात भविष्यवाणी करताना तो म्हणाला की, “भारतीय संघ या मालिकेत वेस्ट इंडिजला २-१ च्या फरकाने हरवेल.”
हेही वाचा- दुसऱ्या वनडेला स्पेशल पाहुण्यांची उपस्थिती, पण रोहित- विराटशी नाही होऊ शकली ‘युवा ब्रिगेड’ची भेट
पुढे तो म्हणाला की, “२०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतातच पार पडणार आहे आणि भारतीय संघाला मायदेशात पराभूत करणे कठीण आहे. मला असे वाटते की रोहित शर्मा बराच काळ दुखापतग्रस्त होता. त्याला खूप विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून तो आता तंदुरुस्त झाला आहे. एकदिवसीय मालिकांमधील भारताची कामगिरी पाहता भारतीय संघ स्पर्धेच्या जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाईल.”
रिषभ पंतने वेस्टइंडीज सामन्याच्या अगोदर ४ वेळा आयपीएलमध्ये सलामी दिली आहे. त्याने शानदार फलंदाजी करत सर्वाधिक १०४ धावा केल्या आहेत. पंतने २६.०० च्या सरासरीने १ अर्धशतक आणि सर्वाधिक ६९ धावा केल्या आहेत.
भारत आणि वेस्ट इंडीज एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला, आता बुधवारी दुसरा सामना खेळला जात गेला. तर शुक्रवारी तिसरा सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्यकुमारचे अर्धशतक ठरले विक्रमी! ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच क्रिकेटर
दुसऱ्या वनडेला स्पेशल पाहुण्यांची उपस्थिती, पण रोहित- विराटशी नाही होऊ शकली ‘युवा ब्रिगेड’ची भेट
कर्णधार रोहितचा ‘मास्टरस्ट्रोक’ निघाला निकामी, तब्बल ११ वर्षांनंतरचा ‘तो’ प्रयत्न सपशेल फेल