नवी दिल्ली। भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू अजित आगरकरने आपली एक इच्छा व्यक्त केली आहे, जी कर्णधार विराट कोहली पूर्ण करणार आहे. खरं तर आगरकरचे असे म्हणणे आहे की, विराटने आपल्या कारकिर्दीत एकदा तरी त्रिशतक झळकावले पाहिजे. ही कामगिरी करणे त्याच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही.
विराटकडे आहे क्षमता
आगरकरने स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात बोलताना याबाबत मत मांडले. तो म्हणाला, “मी अपेक्षा करतो की, विराट आपली कारकीर्द संपविण्यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक नक्की करेल. आतापर्यंत भारतीय फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये ३ त्रिशतक ठोकले आहे. यातील २ त्रिशतक विरेंद्र सेहवागने, तर १ त्रिशतक करूण नायरने ठोकले आहे. विराटकडे अजूनही अनेक संधी आहे तसेच त्याच्याकडे त्रिशतक ठोकण्याची क्षमताही आहे.”
विराट आहे सर्वोत्तम फलंदाज
आगरकरने पुढे म्हटले, “मला आशा आहे की, निवृत्ती घेण्यापूर्वी विराट त्रिशतक करेल. तरीही त्यापूर्वी अनेक विक्रम आहेत, जे तो तोडणार आहे. असे वाटते की, तो २० वर्षांपासून खेळत आहे. ज्याप्रकारे तो पुढे जात आहे, ते नक्कीच प्रशंसनीय आहे. सध्या तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.”
केवळ २ भारतीय फलंदाजांनी ठोकले आहे त्रिशतक
विशेष म्हणजे आतापर्यंत केवळ २ भारतीय फलंदाज असे आहेत, ज्यांनी त्रिशतक ठोकले आहे. यातील एक फलंदाज म्हणजे सेहवाग होय. त्याने २ त्रिशतक, तर करूण नायरने १ त्रिशतक ठोकले आहे.
विराटने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ-मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विराटने कसोटीत ७वेळा द्विशतक ठोकले आहे. त्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही २५४ आहे. परंतु त्याला आतापर्यंत एकदाही त्रिशतक झळकावता आले नाही.
विराटने भारतीय संघाकडून आतापर्यंत ८६ कसोटी सामने, २४८ वनडे सामने आणि ८२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. हे सामने खेळताना त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण २० हजापेक्षाही अधिक धावा कुटल्या आहेत. सोबतच या धावा करताना त्याने एकूण ७० शतकांना गवसणी घातली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-आर्थिक संकटाने ग्रस्त असलेल्या अशरफ चाचांच्या मदतीसाठी सचिन आला पुढे
-आश्चर्यकारक! खेळपट्टीमध्ये दबला चेंडू, सामन्याला झाला उशीर
-गिब्ज, विराटला वगळत रैनाने निवडले जगातील सर्वात्तम ५ क्षेत्ररक्षक
ट्रेंडिंग लेख-
-असे ३ खेळाडू ज्यांनी केली आहे १० स्थानांवर फलंदाजी
-सेहवाग, गंभीर, विराट अशा दिल्लीकरांचे क्रिकेट करियर घडवणारा राजकारणी नेता
-‘या’ ५ क्रिकेटर्सच्या नावाची गंमतच वेगळी, मोठ्या शहरांची आणि यांची नावं आहेत सारखी