आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सर्व संघांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सर्व संघांनी मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, ऍरॉन फिंच यांसारख्या अनुभवी खेळाडूंना संघांनी सोडले असल्याने आगामी आयपीएल लिलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशात सलग दोन वर्षे आयपीएलमध्ये फ्लॉप ठरलेल्या मॅक्सवेलविषयी भारताचे माजी खेळाडू अजित आगरकर यांनी मोठे भाकीत केले आहे. आगरकरांच्या मते ग्लेन मॅक्सवेल आयपीएल 2021 लिलावात 10 कोटी रुपयांच्या किंमती मध्ये देखील विकला जाऊ शकतो.
एका कार्यक्रमादरम्यान बोलताना आगरकर म्हणाले की, “कोणीही काहीही अंदाज वर्तवू शकत नाही. किंग्ज इलेव्हन पंजाबने मॅक्लवेलला संघातून डच्चू दिला आहे. पण कदाचित आयपीएलमध्ये खास कामगिरी न करू शकलेल्या मॅक्सवेलला आगामी लिलावात एखादा संघ 10 कोटी रुपयांमध्ये देखील खरेदी करू शकतो. मॅक्सवेल बाबत प्रत्येक वर्षीच असेच घडले आहे. पण माझ्या मते आता बाबी पहिल्यापेक्षा थोड्या वेगळ्या असतील.”
आगरकर पुढे म्हणाले की, “आयपीएल लिलावामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला इच्छेनुसार खेळाडू मिळण्याची शक्यता आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबकडे 50 कोटी इतकी मोठी रक्कम आहे. त्यामुळे त्यांना लिलावामध्ये एक ते दोन मोठे खेळाडू विकत घेण्याची संधी असेल.”
ग्लेन मॅक्सवेलने दोन वर्षात केले नाही एकही अर्धशतक
ऑस्ट्रेलिया संघाचा स्फोटक खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला मागील हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने खरेदी केले होते. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला अपेक्षा होती की, ग्लेन मॅक्सवेल आपल्या संघात आल्याने संघाचे मनोबल वाढेल. ग्लेन मॅक्सवेलने आयपीएलचा तेरावा हंगाम सुरू होण्यापूर्वी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात शतक ठोकले होते. मात्र त्यानंतर आयपीएलच्या तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना, तो पूर्णपणे अपयशी ठरला.
त्याने आयपीएलच्या तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यावेळी पूर्ण हंगामात 14 सामने खेळत 108 धावा केल्या होत्या. त्याने यामध्ये 9 चौकार ठोकले होते. मात्र त्याला यामध्ये एकही षटकार ठोकता आला नव्हता. सोबतच तो साधे अर्धशतकही करू शकला नव्हता. तत्पुर्वी आयपीएल 2018मध्येही 12 सामन्यात 47 धावांच्या सर्वोच्च खेळीसह अवघ्या 169 धावा केल्या होत्या.
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने रिलीज केलेल खेळाडू
किंग्ज इलेव्हन पंजाब संगाने ग्लेन मॅक्सवेलसह शेल्डन कॉटरेल, कृष्णाप्पा गौतम, मुजीब उर रहमान, जिमी निशम, करून नायर, जगदीश सुचित, तजींदर सिंग, हारदुस विलोजेन संघातून मुक्त केले आहे.
त्याचबरोबर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने मागील पाच वर्षात प्रथमच आपल्या संघाच्या प्रशिक्षकाला रिटेन केले आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने अनिल कुंबळे यांना संघाचे प्रशिक्षक म्हणून आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी कायम ठेवले आहे. त्याचबरोबर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने संघाने 25 खेळाडूंच्या ताफ्यातील 16 खेळाडूंना आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी रिटेन केले आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी रिटेन केलेले खेळाडू :
केएल राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, मयंक अगरवाला, निकोलस पूरनन, मनदीप सिंग, सरफराज खान, दीपक हुड्डा, प्रभसिमरन सिंग, मोहम्मद शमी, क्रिस जॉर्डन, दर्शन नळकांडे, रवि बिष्णोई, मुरुगुन आश्विन, अरशदीप सिंग, इशान पोरेल, हरप्रीत ब्रार.
महत्त्वाच्या बातम्या-
“शुबमन गिलमध्ये प्रतिभा आहे, पण एवढ्या लवकर झाडावर चढवणं…”, माजी भारतीय क्रिकेटरचं वक्तव्य
जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर पड्डीकलची कमाल, ११ धावा करूनही केला खास विक्रम