सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकून आघाडी घेतलीये. त्याचवेळी या मालिकेत रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे उपकर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरच्या खांद्यावर दिली गेलीये. श्रेयसने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावून आपली ही जबाबदारी पार पाडली होती. मात्र, असे असताना देखील भारताचा माजी अष्टपैलू अजित आगरकर याने एक मोठे विधान केले आहे.
काय म्हणाला आगरकर?
श्रेयस अय्यर सध्या काहीशा खराब फॉर्ममध्ये आहे. मात्र, वेस्ट इंडीजविरुद्ध त्याने अर्धशतक झळकावून फॉर्ममध्ये येण्याचे संकेत दिले होते. मात्र, याआधीच्या सामन्यांमध्ये तो जास्त धावा करू शकला नव्हता. तसेच आखूड टप्प्यांच्या चेंडूंवर तो सतत बाद होत होतोय. प्रत्येक गोलंदाजाला त्याची ही कमकुवत बाजू माहीत झाली असून, ते त्याच्याविरुद्ध असेच चेंडू टाकून त्याला बाद करत आहेत.
त्याच्या याच कमजोरी बाबत बोलताना भारताचा माजी अष्टपैलू अजित आगरकर म्हणाला,
“आता गोष्टी बदलल्या आहेत. श्रेयस अय्यर असा खेळाडू आहे ज्याची जागा धोक्यात आहे. सूर्यकुमार यादव किती अप्रतिम खेळतोय, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. याशिवाय आणखी एक समस्या आहे. त्याला त्याच्या आखूड टप्प्याच्या चेंडूंविरूद्धच्या कमजोरीवर काम करावे लागेल.”
अगदी काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडचा दिग्गज अष्टपैलू व समीक्षक स्कॉट स्टायरिश याने देखील अशाच प्रकारचे एक विधान केले होते. त्याच्यामध्ये श्रेयस अय्यर भारतीय संघाचा पुढील कर्णधार होऊ शकतो. मात्र, त्यासाठी त्याला आपल्या कमजोरीवर काम करावे लागेल. तो असे करू न शकल्यास त्याची भारतीय संघातील जागाही धोक्यात येऊ शकते. सध्या श्रेयस भारताच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघामध्ये आहे. मात्र, त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला हळूहळू एका संघातून बाहेर केले जातेय. इंग्लंड दौऱ्यावर तो पूर्ण वनडे मालिका खेळू शकला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचा कर्णधार रोहित शर्मा कुटुंबासोबत मग्न, पत्नी रितीकासोबतचे फोटो केले शेअर
विराट नाही तर सूर्यकुमार ठरतोयं ‘या’ खेळाडूसाठी धोकादायक, भारताच्या दिग्गजाचे आश्चर्यकारक विधान
WIvsIND: दुुसऱ्या वनडेत कसे असेल हवामान, तर खेळपट्टीवर कोणाचे पारडे ठरणार जड; वाचा सविस्तर