भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. रहाणेने शुक्रवारी वडापाव खातानाचा स्वत: चा फोटो शेअर केला.
हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना रहाणेने विचारले आहे की ‘तुम्हाला कशाप्रकारे वडापाव खायला आवडतो? चहासोबत वडापाव खायला आवडतो, चटनी सोबत खायला आवडतो की, फक्त वडापाव खायला आवडतो.’
https://twitter.com/ajinkyarahane88/status/1215549739489316864
रहाणेच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांची उत्तरे आली आहेत. तसचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही या पोस्टवर रहाणेला उत्तर दिले आहे.
सचिनने लिहिले की, ‘मला लाल चटणीसह वडापाव खायला आवडतो, त्यात थोडी हिरवी चटणी आणि थोडी चिंचेची चटणी मिसळल्यामुळे हे मिश्रण आणखी चांगले होते.’
https://twitter.com/sachin_rt/status/1215567256173760512
रहाणे नुकताच रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून 3 सामन्यांत खेळला आहे. मात्र त्याला यामध्ये खास कामगिरी करता आली नाही.
https://twitter.com/Maha_Sports/status/1215648815383904256
https://twitter.com/Maha_Sports/status/1215635681420042241