---Advertisement---

IPL 2024 । विलियम्सन का नाही बनला गुजरात टायटन्सचा कर्णधार? माजी सलामीवीराने दिले उत्तर

Kane Williamson
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी सर्व संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. हार्दिक पंड्या याला मुंबई इंडियन्सने ट्रेड केल्याने अनेकांना धक्का बसला. आगामी हंगामात हार्दिक मुंबईसाठी खेळताना दिसणार म्हटल्यावर गुजरात टायटन्सने तत्काळ आपल्या संघासाठी नवा कर्णधार नियुक्त केला. शुबमन गिल याला गुजरातचे कर्णधारपद दिले गेले. पण दुसरीकडे केन विलियम्सन पात्र असताना त्याला कर्णधार का बनवले नाही, असा प्रश्न चाहते विचारत आहेत. भारतीय संघाच्या माजी सलामीवीर फलंदाजाकडून या प्रश्नाचे उथ्तर चाहत्यांना मिळाले आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2023) साठी 19 डिसेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला जाणार आहे. त्याआधी रविवारी (26 नोव्हेंबर) सर्व फ्रँचायझींना आगामी हंगामासाठी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची होती. गुजरातने जाहीर केलेल्या यादीत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याचे नाव होते. पण ही यादी समोर आल्यानंतर काहीच तासांमध्ये हार्दिकने मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात पुनरागमनाचा निर्णय घेतला. हा निर्णय गुजरातच्या चाहत्यांसाठी धक्का दायक होता. हार्दिकने अचानक संघ सोडल्यानंतर शुबमन गिल (Shubman Gill) आगामी हंगामात गुजरातचा कर्णधार असेल. केन विलियम्सन (Kane Williamson) देखील कर्णधारपदासाठी दावेदार होता. पण संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवला नाही.

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Akash Chopra) याने विलियम्सनला कर्णधारपद न मिळण्याचे कारण सांगितले. तो म्हणाला, “गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार शुबमन गिल आहे. 23 व्या वर्षी त्याच्यासोबत खूपकाही घडलं आहे, जे आकर्षक आणि शानदार आहे. हार्दिक संघातून जाताच हे जवळपास निश्चित होते की, शुबमन कर्णधार बनेल.”

“विलियम्सनला कर्णधार बनवण्यावरही विचार सुरू होता. पण तुमच्याकडे हैदराबादचे उदाहरण आहे. केन खूप चांगला खेळाडू आहे. पण जर तो चांगला खेळत नसेल, तर स्वतःला संघातून ड्रॉप करतो. संघात चार विदेशी खेळाडू असतात. त्यातून विलियम्सन कर्णधार बनणार. तुम्हाला राशिद खान संघात हवा असतो. नूर अहमद त्याला तुम्ही खेळवू इच्छिता. डेव्हिड मिलरला खेळवणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे. अशात शुबमन गिल चांगला पर्याय ठरतो. माझ्या मते भारतीय खेळाडूला कर्णधार बनवले पाहिजे,” असे आकाश चोप्रा म्हणाला. (Akash Chopra explained the reason for not getting Gujarat Titans captain Kane Williamson)

महत्वाच्या बातम्या – 
कसोटीत ग्लेन फिलिप्सचे जोरदाक कमबॅक, सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशची धावसंख्या 300+ 
जडेजा झालेला आयपीएलमधून बॅन! हार्दिकच्या ट्रेडनंतर पुन्हा आला चर्चेत, काय होते प्रकरण?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---