वनडे विश्वचषक समाप्त झाल्यानंतर आता सर्वत्र आयपीएलची चर्चा सुरू आहे. आयपीएल रिटेन्शन झाल्यानंतर देखील झालेल्या हार्दिक पंड्याच्या ट्रेडमुळे अनेक जण आश्चर्यचकित झाले आहे. हा ट्रेड आयपीएलच्या नियमानुसार झाला असला तरी, गुजरात टायटन्स संघाचे कर्णधारपद सोडून हार्दिक मुंबई इंडियन्सकडे केवळ खेळाडू म्हणून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या सर्वांमध्ये आता भारताचा व चेन्नई सुपर किंग्सचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा यावर आयपीएलमध्ये एक वर्षासाठी घातलेल्या बंदीचा विषय नव्याने सुरू झालेला आहे.
मागील आठवडाभरापासून हार्दिक पुन्हा एकदा मुंबई संघात येणार अशी चर्चा सुरू होती. आयपीएल रिटेन्शन दिवशी मात्र तो गुजरात सोबतच राहणार असल्याचे निश्चित झालेले. मात्र, दुसऱ्या दिवशी मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स यांनी याबाबत अधिकृत घोषणा करत हार्दिक मुंबई इंडियन्सकडे पोहोचल्याचे सांगितले. आयपीएल रिटेन्शननंतर सुरू झालेल्या दुसऱ्या ट्रेडमध्ये मुंबईने त्याला आपल्या संघात सामील केले. विशेष म्हणजे हार्दिक व मुंबई यांच्या दरम्यान यापूर्वीच याबाबत चर्चा सुरू होती. गुजरात संघाचे अधिकारी विक्रम सोलंकी यांनी हार्दिक हा गुजरातमध्ये राहण्यास इच्छुक नव्हता असे म्हटले.
सध्याच्या आयपीएल नियमानुसार हार्दिक याने योग्य प्रकारे ट्रेड केला असला तरी, आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात अशा प्रकारच्या ट्रेडवर बंदी होती. आयपीएल 2010 पूर्वी राजस्थान रॉयल्स रवींद्र जडेजा याच्यासोबत आपले कॉन्ट्रॅक्ट पुढे ठेवण्यासाठी इच्छुक होती. मात्र, त्यावेळी जडेजाने परस्पर मुंबई इंडियन्सशी चर्चा केलेली व तो राजस्थान संघासोबत करार वाढवण्यास इच्छुक नव्हता. ही बातमी समोर आल्यानंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने त्याच्यावर आयपीएल 2010 मध्ये खेळण्यासाठी बंदी घातलेली.
(Why Ravindra Jadeja Ban From IPL 2010 Now Hardik Pandya Trade)
हेही वाचा-
मोठी बातमी! नामीबिया T20 World Cup 2024साठी क्वालिफाय, 19 संघ फिक्स; आता 1 जागेसाठी 3 संघात टक्कर
T20 World Cup: विराटच्या विक्रमाची बरोबरी करणारा डेरिंगबाज सिकंदर! हॅट्रिक घेत इतिहासही घडवला