---Advertisement---

कर्णधार फाफची सुट्टी, तर कोहलीला मोठ्या किंमतीत केलं रिटेन; आरसीबीच्या मनात नेमकं काय?

Virat-Kohli-And-Faf-Du-Plessis
---Advertisement---

आयपीएल 2025 साठी खेळाडूंना कायम ठेवण्याची आणि सोडण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर होती. अशा परिस्थितीत संध्याकाळपर्यंत सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध संघांपैकी एक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने केवळ तीन खेळाडूंना रिटेन केले.

यावेळी विराट कोहली आरसीबीसाठी आयपीएल 2025 मधील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विराट कोहलीला 21 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. तो आरसीबीची पहिली पसंती ठरला.

विराट कोहलीशिवाय आरसीबीने रजत पाटीदारला 11 कोटी आणि वेगवान गोलंदाज यश दयालला 5 कोटींमध्ये कायम ठेवले आहे. आरसीबीने आपला कर्णधार फाफ डुप्लेसिसला कायम ठेवलेले नाही. अशा स्थितीत विराट कोहली पुढील हंगामात आरसीबीचे कर्णधारपद भूषवण्याची शक्यता आहे. तथापि, फ्रँचायझीने केवळ 3 खेळाडूंना कायम ठेवले असेल तरी, त्यांच्याकडे 3 आरटीएम कार्ड असतील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मेगा लिलावात राईट टू मॅच कार्ड वापरून प्लेसिसला पुन्हा एकदा आपल्या ताब्यात सामील करू शकते.

विराट कोहली पहिल्या सत्रापासून आरसीबीसोबत आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज असून, त्याने आतापर्यंत खेळलेल्या 252 सामन्यांच्या 244 डावांमध्ये 38.66 च्या सरासरीने आणि 131.97 च्या स्ट्राईक रेटने 8004 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 55 अर्धशतकांसह 8 शतके झळकावली आहेत. लीगमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 113 धावा आहे. आयपीएल 2016 मध्ये विराट कोहलीने सर्वाधिक 973 धावा केल्या होत्या. त्याने 2020 मध्ये आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.

मागील हंगामात आरसीबी संघ खराब सुरुवातीनंतरही प्ले ऑफ्समध्ये पात्र ठरण्यात यशस्वी ठरलेला. मात्र, एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने त्यांना पराभूत केले होते. विशेष म्हणजे आरसीबीला अद्याप एकदाही या स्पर्धेत विजेतेपद जिंकता आले नाही.

हेही वाचा – 

आयपीएल 2025 साठी सर्व संघांनी कोणकोणत्या खेळाडूंना रिटेन केलं? रोहित-विराटचं काय झालं? संपूर्ण लिस्ट येथे वाचा

पंत-राहुलवर इतक्या कोटी रुपयांची बोली लागेल! आकाश चोप्रांनी आकडा सांगितला
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, दोन नवीन खेळाडूंना मिळाली संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---