---Advertisement---

आयपीएल 2023 वर कोरोनाचे सावट! महामारीच्या कचाट्यात अडकला भारतीय दिग्गज

MS-Dhoni-And-Virat-Kohli
---Advertisement---

सध्या सर्वत्र आयपीएलचे वारे पाहत आहेत. यामध्ये क्रिकेटपटूंव्यतिरिक्त समालोचक आकाश चोप्रा देखील चर्चेचा विषय ठकर आहे. आकाश चोप्रा लाईव्ह सामन्यादरम्यान आपल्या अप्रतिम समालोचनासाठी ओळखला जातो. पण यवर्षीच्या आयपीएल हंगामादरम्यान आकाश चोप्राला काही दिवसांच्या विश्रांती घ्यावी लागणार आहे. यामागचे कारण आहे कोरोना व्हायरल.

कोरोना महामारीमुळे मागचे तीन आयपीएल हंगाम भारताबाहेर खेळले गेले. यावर्षी कोरोना व्हायरचे सावट नाहीचे झाल्यामुळे बीसीसीआयने आयपीएल पुन्हा भारतात आयोजित केला. पण अशातच समालोचक आकाश चोप्रा (Akash Chopra) याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. आकाश चोप्राने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही पोस्ट शेअर केली आहे. कोरोना झाल्याने आकाश चोप्रा पुढचे काही दिवस आयपीएलदरम्यान समालोचक करू शकणार नाही.

कोरोनाची लागण झाल्याची माहिती आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब कम्यूनिटी पोस्टमधून शेअर केले आहेत. आकाश चोप्राने आपल्या ट्वीटर पोस्टमध्ये लिहिले की, “कोवीट 19ने पुन्हा घेरले आहे. पण लक्षणे खूप सामान्य आहेत आणि पिरिस्थिती हातात आहे. पुढच्या काही दिवसांसाठी समालोचनापासून लांब असेल. जोरदार पुनरागमन करेल अशी अपेक्षा.”

आकाश चोप्रा जरी आज सर्वोत्तम क्रिकेट समालोचकांपैकी एक असला. तरी क्रिकेटच्या मैदानात खेळाडू म्हणून त्याला जास्त मोठी कामगिरी करता आली नाही. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 10 कसोटी सामने खेळले, ज्यातील 19 डावांमध्ये 437 धावा केल्या. यादरम्यान आकाशचा स्ट्राईक रेट 34.60 होता, तर सरासरी 23.00 होती.
(Akash Chopra is infected with Corona and will not be able to do commentary for the next few days)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

धोनीने सामनाच नाही, तर मनेही जिंकली; विजयानंतर ‘माही’चा अन् गौतमच्या मुलीचा प्रेमळ फोटो तुफान व्हायरल
Breaking । आरसीबीला मोठा झटका! वरच्या फळीतील फलंदाजाने घेतली संपूर्ण हंगामातून माघार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---