भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शूबमन गिल याने नुकतीच आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मिळालेल्या संधीचे सोने करत त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. परंतु त्यानंतर तो आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु तो पहिल्या डावात २८ तर दुसऱ्या डावात ८ धावा करत माघारी परतला होता. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका केली जात आहे. अशातच माजी भारतीय फलंदाज आकाश चोप्रा याने त्याच्यावर टीका केली आहे.
भारतीय संघासाठी १० कसोटी सामने खेळलेल्या माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, “तो न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात आत येणाऱ्या चेंडूवर बाद झाला. तो चेंडू त्याच्या पॅडला जाऊन धडकला होता. तर पहिल्या डावात तो बाहेर जात असलेल्या चेंडूवर बाद झाला होता. त्यामुळे त्याने फलंदाजी करताना थोडे सावध राहायला हवे.” (Aakash chopra says, Shubman gill will not able to open for long in Test)
भविष्यात शूबमन तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळेल
तसेच तो पुढे म्हणाला की, “शूबमन गिल येती १० ते १५ वर्षे कसोटी क्रिकेट खेळू शकतो. परंतु तो एक सलामी फलंदाज म्हणून खेळू शकणार नाही. त्याची कारकीर्द जशी जशी पुढे जात राहील, तसा तो आणखी खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येईल. मला असे वाटते की, तो तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.”
https://youtu.be/JpaSGR-BMdg
“शूबमन गिल आता भारतीय कसोटी संघासाठी डावाची सुरुवात करत आहे. त्यामुळे त्याने जास्त धावा कराव्यात अशी सर्वांचीच इच्छा असते. त्याचा टायमिंग चांगला आहे. परंतु त्याची बॅट खूप खालून येते, ज्यामुळे यष्टीच्या मागे झेलबाद आणि पायचीत होण्याची भिती असते,” असे त्याने शेवटी सांगितले
महत्वाच्या बातम्या –
नवी सुरुवात! आगामी कसोटी चँपियनशीपसाठी टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर, भिडणार ‘या’ संघांशी
‘सर म्हणणे चुकीचे नाही,’ भारतीयांची खिल्ली उडवल्याचा आरोप होत असलेल्या ट्वीटवर मॉर्गनची प्रतिक्रीया
भारतीय संघाच्या पहिल्या विश्वविजेतेपदाची ३८ वर्षे