माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने नवीन वर्षाच्या आधी वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघाची निवड केली असून त्याने आपल्या संघात भारतातील चार खेळाडूंची निवड केली आहे. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियाचे दोन, इंग्लंडचे तीन आणि न्यूझीलंड आणि बांगलादेशचे प्रत्येकी एक खेळाडू आपल्या संघात निवडला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आकाश चोप्राने पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघातून एकाही खेळाडूची निवड केलेली नाही.
आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने आपल्या कसोटी संघात उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. उस्मान ख्वाजा या वर्षी ऑस्ट्रेलियासाठी खूप चांगला खेळला आणि सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. रोहित शर्माने 2023 मध्ये 545 धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर आकाश चोप्राने इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट (Joe Root) याची निवड केली आहे. यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याची चौथ्या क्रमांकावर तर इंग्लंडच्या हॅरी ब्रूक (Harry Brook) याची पाचव्या क्रमांकावर निवड केली आहे.
बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) याचाही आकाश चोप्राने त्याच्या वर्षातील कसोटी संघात समावेश केला आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर त्याने भारताचे रविचंद्रन अश्विन (R Ashwin) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांची फिरकी गोलंदाज म्हणून निवड केली आहे. जडेजाने बॉल आणि बॅट दोन्हीमध्ये उत्कृष्ट योगदान दिले होते. वेगवान गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर आकाश चोप्राने न्यूझीलंडचा टिम साऊथी, (Tom Southee) इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) आणि ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याची निवड केली आहे. स्टुअर्ट ब्रॉडने यावर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. (Akash Chopra selected the Test Team of the Year giving place to these four Indians)
आकाश चोप्राची ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’ अशाप्रकारे आहे.
रोहित शर्मा, उस्मान ख्वाजा, जो रूट, विराट कोहली, हॅरी ब्रूक, मुशफिकुर रहीम, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, स्टुअर्ट ब्रॉड, टिम साऊदी आणि मिचेल स्टार्क.
हेही वाचा
इंग्लंडच्या माजी कर्णधाराची विराटबद्दल मोठी भविष्यवाणी, म्हणाला, ‘तो 2024 मध्ये सर्वात…’
‘IPL ही ऑलिम्पिकसारखी’, लखनऊ संघाच्या नवीन प्रशिक्षकाचं जगातील सर्वात मोठ्या टी20 लीगबाबत विधान