लखनऊ सुपर जायंट्स संघाचे नवा मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर याने आयपीएलबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने या लीगचे खूप कौतुक केले आहे आणि त्याची ऑलिम्पिकशी तुलना केली आहे. जस्टिन लँगरच्या मते, आयपीएल ऑलिम्पिक खेळांसारखी आहे, जिथे प्रत्येक सामना खूप मोठा असतो.
लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जस्टिन लँगर (Justin Langer) यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. अँडी फ्लॉवर याचा करार संपल्यानंतर जस्टिन लँगरची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जस्टिन लँगरच्या म्हणण्यानुसार, तो रिकी पाँटिंग आणि टॉम मूडी यांच्याशी आयपीएलबद्दल खूप चर्चा करत असे आणि हे दोन्ही दिग्गज त्याला आयपीएलबद्दल खूप काही सांगत. लखनऊ सुपर जायंट्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जस्टिन लँगर म्हणाला, “मी जेव्हा रिकी पाँटिंगसोबत बसायचो तेव्हा तो मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये घालवलेल्या वेळेबद्दल सांगत असे. रिकी पाँटिंग (Ricky Ponting) त्याला आयपीएल किती आवडते हे सांगायचा. याशिवाय टॉम मूडी (Tom Moody) जो माझा चांगला मित्र आहे, तो देखील अनेक वर्षे आयपीएलमध्ये प्रशिक्षक होता आणि त्याने मला अनेक गोष्टी सांगितल्या. आयपीएल हे ऑलिम्पिक खेळासारखे आहे. हे खूप मोठे आहे. इथला प्रत्येक सामना जबरदस्त असतो. या लीगला मोठा पाठिंबा मिळतो. त्यामुळे मी त्याचा एक भाग होण्यासाठी खूप उत्सुक आहे.”
जस्टिन लँगरच्या कोचिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने टी20 विश्वचषक 2021 चे विजेतेपद पटकावले होते. याशिवाय त्याच्या नेतृत्वाखाली पर्थ स्कॉचर्सने बिग बॅश लीगचे तीन वेळा विजेतेपद पटकावले. या कारणास्तव, असे म्हणता येईल की जस्टिन लँगर आयपीएलमध्ये देखील खूप योगदान देऊ शकतो. (IPL is like Olympics Lucknow’s new coach’s statement about the world’s biggest T20 league)
हेही वाचा
‘डेव्हिड वॉर्नर फक्त वीरेंद्र सेहवागच्या मागे’, भारताच्या माजी प्रशिक्षकाचं धक्कादायक विधान
‘विराट हा रोहितपेक्षा मोठा फलंदाज, त्याला पुन्हा कर्णधार बनवायला हवे…’, माजी खेळाडूचे धक्कादायक विधान