भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा मागच्या मोठ्या काळापासून धावा करण्यासाठी झगडत आहे. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने नुकताच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला. या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघ 209 धावांनी पराभूत झाला. ऍशेस 2023 पासून डब्ल्यूटीसी 2023-25 हंगामाची सुरुवात झाली. पण रोहित शर्मा या संपूर्ण हंगामात संघाचे नेतृत्व करेलच, याची खात्री देता येणार नाही. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यानेही याविषयी शंका व्यक्त केली आहे.
मागच्या वर्षी विराट कोहली (Virat Kohli) कसोटी कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma ) संघाचा नवीन कर्णधार बनला. पण अजून किती दिवस रोहित ही जबाबदारी पार पाडणार याविषयी अनेकांना शंका आहेत. याच पार्श्वभूमीवर आकाश चोप्राने आपले मत व्यक्त केली आहे. आकाश चोप्रा (Akash Chopra) आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणाला की, “रोहित शर्मा एक चांगला कर्णधार आहे, यात शंकाच नाही. तो एक चांगला कसोटी फलंदाज आहे, यातही शंका नाही. पण भविष्यात असे असेल, याची खात्री कुणालाच देता येणार नाही. कारण मागच्या दोन डब्ल्यूटीसी हंगामांमध्ये आपण अंतिम सामन्यात पोहोचलो आहोत. पण एकदाही जिंकू शकलो नाही. तसेच रोहितचे वय देखील त्याच्या सोबत नसेल. हे सत्य आहे.”
डब्ल्यूटीसी 2023-25 हंगाम पुढचे दोन वर्ष खेळला जाणार आहे. आकाश चोप्राच्या मते हा मोठा काळ आहे. तो म्हणाला, “पुढची दोन वर्ष पाहिल, तर अजून एक डब्ल्यूटीसी हंगाम रोहित शर्मा खेळू शकतो. पण यासाठी खरोखर त्याला कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा पाहिजे. कारण एकूण सहा मालिका खेळण्यासाठी खूप वेळ लागतो.” कर्णधार म्हणून रोहित पुढची दोन वर्ष टिकेल असे आकाश चोप्राला वाटत नसले, तरी रोहितच्या गुणवत्तेवर त्याला शंका नाहीये. चोप्राच्या मते रोहितला खेळाची चांगली समज आहे आणि तो कधीच किरकोळ चुका होऊ देत नाही.
दरम्यान, रोहित शर्मा सध्या 36 वर्षांचा आहे. मोगच्या मोठ्या काळापासून त्याच्या फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. डब्ल्यूटीसीच्या आगामी अंतिम सामन्यापर्यंत त्याचे वय 38 वर्ष होईल. असात भारतीय कर्णधार तोपर्यंत संघाचे नेतृत्व करणार की नाही, हा मोठा प्रश्नच आहे. तरी येत्या काळातील आपले प्रदर्शन पाहून रोहित स्वतःच याविषयी निर्णय घेऊ शकतो. (Akash Chopra’s on Rohit Sharma’s Test captaincy)
महत्वाच्या बातम्या –
निवृत्ती मागे घेतलेल्यानंतर मोईन अलीवर आयसीसीची मोठी कारवाई! जाणून घ्या कारण
“फक्त आक्रमकता असून चालत नाही, माझ्या संघासारखे…” गांगुलीचे टीम इंडियावर टीकास्त्र