जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यावेळी भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाने 209 धावांनी पराभव केला. मागच्या वर्षी आशिया चषक, त्यानंतर टी20 विश्वचषक आणि आता डब्ल्यूटीसी स्पर्धेत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. लागोपाठ तीन मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला अपयश आल्याने कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. आता यामध्ये भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांचे देखील नाव सामील झाले.
भारतीय संघावर टीका होत असताना सौरव गांगुली यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. त्यामध्ये बोलताना त्यांनी भारतीय संघाच्या सध्याच्या खेळाबाबत प्रतिक्रिया दिल्या. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील कामगिरीविषयी बोलताना तो म्हणाला,
“भारतीय संघ आक्रमकपणे क्रिकेट खेळतो. आक्रमकता महत्त्वाची आहे. मात्र, त्यासोबत तुमची कामगिरीही तशी व्हायला हवी. 2001 ते 2006 या पाच-सहा वर्षांचा आढावा घेतला तर, भारताच्या फलंदाजांनी मोठ्या ठिकाणी 500-600 धावा केल्या. संघाने सिडनी, ब्रिस्बेन, हेडिंग्ले, नॉटिंगहॅम, ओव्हल, पेशावर, इस्लामाबाद आणि लाहोर येथे धावा केल्या. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांवर दडपण असायचे.”
ते पुढे म्हणाले,
“मी समजू शकतो की, गेल्या 10 वर्षांच्या तुलनेत क्रिकेट खूप बदलले आहे. मात्र, भारतीय संघाला कसोटी क्रिकेटच्या पहिल्या डावात 350-400 धावा कराव्याच लागतील.”
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा काढल्या. त्याच्या प्रतिउत्तरात भारतीय संघाला 296 धावा करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या डावात 172 धावांची आघाडी मिळालेली. त्यामुळे भारतीय संघाला अखेरीस मोठा पराभव पत्करावा लागला.
(Sourav Ganguly Slams Team India For Approach In Test Cricket)
महत्वाच्या बातम्या –
बॅझबॉल इफेक्ट! स्टोक्सने ख्वाजाविरूद्ध लावली अनाकलनीय फिल्डिंग, पाहा पुढे काय घडले
बहु झाल्या लीग! आणखी एका देशात सुरू होतेय क्रिकेट लीग, नामांकित खेळाडू होणार सहभागी