सध्या जगभरातील क्रिकेट खेळणाऱ्या जवळपास सर्वच प्रमुख देशांमध्ये टी20 लीग खेळल्या जातायेत. पुढील महिन्यात थेट अमेरिकेतही नवी व्यावसायिक लीग सुरू होतेय. असे असतानाच आता झिम्बाब्वेमध्ये टी10 लीग सुरू होणार असून, यामध्ये अनेक प्रमुख खेळाडू खेळताना दिसतील.
अबुधाबी येथे मागील पाच वर्षापासून टी10 क्रिकेट लीग खेळली जाते. दहा षटकांच्या या सामन्यांमध्ये जगभरातील अनेक नामांकित खेळाडू खेळताना दिसतात. आखाती देशांमध्ये या स्पर्धेला मिळालेल्या यशानंतर आता आयोजकांनी ही स्पर्धा झिम्बाब्वेमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अद्याप या स्पर्धेच्या तारखा तसेच लिलावाबद्दल काही घोषणा झाली नसली तरी, या स्पर्धेत सहा संघ खेळताना दिसतील.
टी10 स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर राजीव खन्ना म्हणाले, “20 जुलै हा दिवस टी10 स्पोर्ट्स आणि जिम-आफ्रो टी10 साठी एक ऐतिहासिक दिवस असेल. या दिवशी आम्ही झिम्बाब्वे या क्रिकेट इतिहासातील एक खास देश असलेल्या आमच्या प्रवासाला सुरुवात करू. या देशातील क्रिकेट परिवार टी10 स्पर्धेचा पुरेपूर आनंद घेईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही.” अबुधाबी येथे होणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटू सहभागी होत असतात.
एकेकाळी क्रिकेट जगतात मानाचे स्थान असलेल्या झिम्बाब्वे संघाची कामगिरी मागील काही काळापासून ढासळली आहे. त्यांच्या संघाची कामगिरी खराब होत असतानाच आर्थिक संकटांशी देखील बोर्डाला झुंज द्यावी लागतेय. असे असताना या लीगमूळे झिम्बाब्वे क्रिकेटला उभारी मिळू शकते असे देखील खन्ना यांनी म्हटले.
(T10 League Next Edition Will Played In Zimbabwe T10 CEO Confirmed)
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघात होणार मोठा बदल? रोहितच्या जागी ‘हा’ पठ्ठ्या बनू शकतो कर्णधार
रणजीत 7 सामन्यात 50 विकेट्स, तरीही दुलीप ट्रॉफीत मिळाली नाही संंधी; गोलंदाज म्हणाला, ‘भारतात…’