क्रिकेटटॉप बातम्या

रणजीत 7 सामन्यात 50 विकेट्स, तरीही दुलीप ट्रॉफीत मिळाली नाही संंधी; गोलंदाज म्हणाला, ‘भारतात…’

केरळचा अष्टपैलू खेळाडू जलज सक्सेना रणजी ट्रॉफी 2022-23 हंगामात चांगलाच चमकला होता. त्याने अवघ्या 7 सामन्यात 19च्या सरासरीने 50 विकेट्स चटकावल्या होत्या. त्याने यादरम्यान 6 वेळा 5 विकेट्स आणि 2 वेळा 10 विकेट्स घेण्याची कामगिरी करून दाखवली होती. तसेच, तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही राहिला. मात्र, एवढे उच्च दर्जाचे प्रदर्शन करूनही दुलीप ट्रॉफी 2023 स्पर्धेत त्याला निवडले गेले नाही. त्याला आशा होती की, दुलीप ट्रॉफीसाठी साऊथ झोन संघात त्याला निवडले जाईल. मात्र, असे घडले नाही. आता याबाबत जलजने ट्वीट करत प्रश्न विचारला आहे.

असे म्हटले जात आहे की, निवडकर्त्यांनी साऊथ झोन संघ निवडताना जलज सक्सेना (Jalaj Saxena) याच्याऐवजी वॉशिंग्टन सुंदर याला जास्त महत्त्व दिले. तसेच, रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेत घातक गोलंदाजी करणाऱ्या जलजला संघात जागा दिली नाही. यानंतर जलज सक्सेना ट्वीट (Jalaj Saxena Tweet) करून निवडकर्त्यांना प्रश्न विचारू लागला. त्याच्यासोबतच वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यानेही जलजला संधी न दिल्याबद्दल बीसीसीआय आणि साऊथ झोनच्या निवडकर्त्यांवर आगपाखड केली.

काय म्हणाला जलज?
जलजने ट्वीट करत लिहिले की, “भारतात रणजी ट्रॉफी (एलिट ग्रूप) स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला दुलीप ट्रॉफीसाठी निवडले गेले नाही. तुम्ही तपासून सांगू शकता की, भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये यापूर्वी असे कधी झाले आहे का? मला फक्त जाणून घ्यायचे आहे. मी कुणालाही दोष देत नाहीये.”

वेंकटेश प्रसादचे ट्वीट
जलजला संघाबाहेर ठेवल्यामुळे वेंकटेश प्रसादनेही ट्वीट करत लिहिले की, “भारतीय क्रिकेटमध्ये सध्या अशा गोष्टी घडत आहेत, ज्यावर हसू येतं. रणजी ट्रॉफीत सर्वाधिक विकेट्स, तरीही साऊथ झोन संघात निवडले नाही. खूपच हैराण करणारं आहे. हे सांगत आहे की, रणजी ट्रॉफीचा काहीच अर्थ नाही. खूपच लज्जास्पद बाब आहे.”

यापूर्वी आणखी एक खेळाडू बाबा इंद्रजीतलाही दुलीप ट्रॉफीसाठी साऊथ झोन संघात निवडले नव्हते. त्यावर दिनेश कार्तिक याने निवडकर्त्यांवर ताशेरे ओढले होते. तसेच, निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. (jalaj saxena tweeted 50 wickets in 7 ranji trophy matches still ignored from duleep trophy read more)

महत्वाच्या बातम्या-
धोनीबाबत धक्कादायक ब्रेकिंग! 2011 वर्ल्डकप फायनलमध्ये युवराजआधी फलंदाजीला येण्याचा केला खुलासा
बापरे बाप! विराट आहे 1000हून अधिक कोटींच्या संपत्तीचा मालक, पण कसा करतो एवढी कमाई?

Related Articles