लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघ बुधवारी (दि. 24 मे) चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर आमने-सामने होते. मुंबईने या सामन्यात लखनऊ संघाला अक्षरशः निष्प्रभ करत 81 धावांनी मोठा विजय मिळवला. आता क्वालिफायर दोनमध्ये त्यांचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध होईल. मुंबईच्या या विजयाचा नायक युवा वेगवान गोलंदाज आकाश मधवाल हा ठरला. त्याने धारदार गोलंदाजी करताना पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यानंतर बोलताना त्याने आपल्या कामगिरीची श्रेय मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याला दिले.
विजयासाठी मिळालेल्या मोठ्या धांवाचा पाठलाग करताना लखनऊ संघाचा डाव आकाश याने सुरुवातीपासूनच स्थिरावू दिला नाही. त्याने आधी सलामीवीर प्रेरक मंकडला बाद केले. त्यानंतर आयुष बधोनी व निकोलस पूरन यांना लागोपाठच्या चेंडूवर डूवर तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर रवी बिश्नोई व मोहसीन खान यांना बाद करत त्याने लखनऊचा डाव संपवला. त्याने 3.3 षटके गोलंदाजी करताना 5 धावा देऊन पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. आयपीएल प्ले ऑफ्स इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
आकाश याने आपल्या या कामगिरीचे श्रेय रोहित शर्माला देताना म्हटले,
“रोहित भैया ने मला खूप आत्मविश्वास दिला. त्यांना जेव्हा गरज वाटली तेव्हा ते माझ्याकडे चेंडू सोपवतात. योग्य वेळी गोलंदाजी दिल्याने चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. माझ्या यॉर्कर्सवर त्यांना विश्वास आहे.”
मुंबई इंडियन्स संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 182 धावा केल्या होत्या. यामध्ये कॅमरून ग्रीन याचे सर्वाधिक योगदान होते. त्याने 41 धावांची खेळी साकारली. त्याने सूर्यकुमार यादव (33) याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी 38 चेंडूत 66 धावांची भागीदारी रचली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ संघाचा डाव 16.3 षटकात 101 धावांवर संपुष्टात आला.
(Akash Madhwal Gives His Success Credit To Mumbai Indians Captain Rohit Sharma)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हुड्डाने पकडला तिलक वर्माचा खतरनाक कॅच, तरीही नवीन रागाने झाला लाल; रिऍक्शन व्हिडिओत कैद
अर्रर्र! नवीनच्या माऱ्यापुढे विस्फोटक सूर्या-ग्रीनने टेकले गुडघे, एकाच ओव्हरमध्ये मुंबईचा खेळ खल्लास