---Advertisement---

IPL ओपनिंग सेरेमनीमध्ये अक्षय-टायगरचा जलवा, रहमान-मोहितनेही गाजवलं चॅपॉक स्टेडियम

---Advertisement---

एआर रहमान, सोनू निगम, मोहित चौहान, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि निती मोहन असे दिग्गज शुक्रवारी (22 मार्च) चॅपॉक स्टेडियमवर एकत्र दिसले. इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामाची सुरुवात शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्याने होत आहे. या सामन्याला सुरुवात होण्याआधी मैदानात आयपीएल हंगामाची ओपनिंग सेरेमनी पार पडली. संगितकार आणि अभिनेत्यांनी आयपीएल सुरू होण्याआधी चाहत्यांचे पैसा वसून मनोरंजन केले.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येत आहे. इंडियन प्रीमियर लीग 2024च्या उद्घाटन समारंभात या दोघांनी जोरदार परफॉर्मंस केला. कार्यक्रमातील पहिलाच डान्स या दोघांचा होता. दोघांनी ‘जय जय शिव शंकर’ गाण्यावर जोरदार डान्स स्टेप्स केल्या. पण चाहत्यांमध्ये उत्साह तेव्हाच संचारला, जेव्हा या दोघांनी ‘देसी बॉइज’ गाण्यावर डान्स केला. या दोघांनी संपूर्ण मैदानात बाईकवर बसून चक्कर देखील मारली. दोघांना पाहून स्टॅन्डमधील चाहत्यांचा आनंद अधिकच पाढला.

यानंतर एआर रहमान आणि सोनू निगम यांची मैदानात एंट्री झाली. या जोडीने वंदे मारतर आणि मां तुझे सलाम या गाण्यांवर परफॉर्मंस दिला. मोहित चौहान आणि ए आर रहमान यांनी एकत्र परफॉर्म केले. या दोघांनी ‘कुन फाया कुन’ आणि ‘मसक्कली’ या गाण्यांच्या परफॉर्मंसवर चाहत्यांची मने जिंकली. रहमानसोबत निती मोहनने गुरू सिनेमातील ‘बरसो रे’ गाण गाईले.

अशाप्रकारे सीएसके आणि आरसीबी यांच्यात हंगामातील पहिला सामना सुरू होण्याआधी चाहत्यांचे पुरेपूर मनोरंजन झाले. बॉलिवूड अभिनेते आणि संगितकारांनीही आपल्या बाजून कुठलीच कसर बाकी सोडली नाही. स्टॅन्डमध्ये चाहते या कार्यक्रमाचा आनंद घेतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Akshay-Tiger’s Jalwa in IPL Opening Ceremony, Rahman-Mohit also rocked Chappauk Stadium)

महत्वाच्या बातम्या – 
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूने जिंकला टॉस, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
मिचेल स्टार्कबाबत ‘या’ दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी, म्हणाला,”आयपीएल 2024 मध्ये तो घेणार इतक्या विकेट्स…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---