---Advertisement---

IPL 2025: रिटेन्शन नियमांबाबत मोठे अपडेट, बेंगळुरूमध्ये बैठकीचे आयोजन, लवकरच होणार घोषणा

On: शनिवार, सप्टेंबर 28, 2024 11:30 AM
---Advertisement---

आयपीएल 2025 चे रिटेनशन नियम लवकरच जाहीर केले जाऊ शकतात. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची आज शनिवारी (28 सप्टेंबर) बंगळुरूमध्ये बैठक होणार आहे. यानंतर नवीन नियम जाहीर होऊ शकतात. रिटेन्शन नियमांसोबतच आयपीएल लिलावाची तारीखही समोर येऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआय संघांना 5 किंवा 6 खेळाडूंसाठी आरटीएम पर्याय देऊ शकते.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची शनिवारी बंगळुरूमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत आयपीएलचे नवीन रिटेनशन नियम जाहीर केले जातील. मेगा लिलावापूर्वी नियमांमध्येही बदल होणार आहेत. यावेळी संघांना बीसीसीआय 5 ते 6 खेळाडूंचा पर्याय ठेवू शकते. गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत मेगा लिलावाच्या तारखेवरही चर्चा होऊ शकते.

बीसीसीआयने जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएल संघांचीही भेट घेतली. नवीन नियमांवर चर्चा झाली. यामध्ये खेळाडूंना कायम ठेवण्याबरोबरच परदेशी खेळाडूंवरही चर्चा झाली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसोबतच वेस्ट इंडिजचे खेळाडूही लिलावात विकल्यानंतर स्पर्धेपूर्वी खेळण्यास नकार देतात. अशा परिस्थितीत संघांना नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे याबाबतही नियम येऊ शकतो.

यावेळेस आयपीएलमध्ये अनेक मोठ्या खेळाडूंचे संघ बदलणार आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. सीएसके धोनीला कायम ठेवू शकते. धोनी आणि सीएसके बद्दलच्या अनेक अफवाही व्हायरल झाल्या. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा संघ बदलत असल्याची अफवा पसरली होती. पण मुंबई इंडियन्स त्याला पुन्हा कायम ठेवू शकतात. यासोबतच आणखी अनेक महत्त्वाचे अपडेट्स लवकरच येतील.

हेही वाचा-

IND vs BAN; कानपूर कसोटीचा दुसरा दिवसही खोळंबला, पावसाची बॅटींग सुरुच
एमएस धोनी की विराट कोहली? दिग्गजानी दिले धक्कादायक उत्तर, म्हणाला- … निवडायला हरकत नाही
इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड, वनडे सामन्यात कांगारुंचा चौथा सर्वात मोठा पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---