---Advertisement---

टीम इंडियाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी असा आहे बांगलादेशचा संघ

---Advertisement---

पुढील महिन्यात बांगलादेश क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात बांगलादेश भारताविरुद्ध 3 टी20 आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे गुरुवारी या दौऱ्यातील टी20 मालिकेसाठी 15 जणांच्या बांगलादेश संघाची घोषणा करण्यात आली आहे.

या संघात फिरकीपटू अराफत सनी आणि वेगवान गोलंदाज अल-अमिन हुसेन यांचे पुनरागमन झाले आहे. त्यांनी 2016 पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तसेच तमिम इक्बालचाही संघात समावेश झाला आहे. या टी20 संघाचे नेतृत्व अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसन करणार आहे.

याबरोबरच बांगलादेशने सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे विरुद्ध खेळलेल्या तिरंगी मालिकेसाठी बांगलादेशच्या संघात असलेले सब्बीर रेहमान, तैजूल इस्लाम, नाजमुल हुसेन शान्तो, रुबेल हुसेन यांना भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संधी दिलेली नाही.

ही टी20 मालिका 3 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. पहिला सामना 3 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये पार पडेल. त्यानंतर 7 आणि 10 नोव्हेंबरला अनुक्रमे दुसरा आणि तिसरा सामना राजकोट आणि नागपूरला होणार आहे. या टी20 मालिकेनंतर 14 नोव्हेंबरपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल.

भारत दौऱ्यातील टी20 मालिकेसाठी असा आहे बांगलादेशचा संघ –

शाकिब अल हसन(कर्णधार), तमिम इक्बाल, लिटॉन दास, सौम्य सरकार, मोहम्मद नैम, मुशफिकूर रहीम, महमुद्दलाह, अफिफ हुसैन, मोसद्दक हुसेन, अमिनुल इस्लाम, अराफत सनी, मोहम्मद सैफुद्दीन, अल-अमिन हुसेन, मुस्तफिजूर रेहमान, शफिउल इस्लाम.

https://twitter.com/BCBtigers/status/1184860064441655296

असा आहे बांगलादेशचा भारत दौऱ्याचे वेळापत्रक – 

टी20 मालिका –

3 नोव्हेंबर – पहिला टी20 सामना – दिल्ली (वेळ – संध्या. 7 वाजता)

7 नोव्हेंबर – दुसरा टी20 सामना –  राजकोट (वेळ – संध्या. 7 वाजता)

10 नोव्हेंबर – तिसरा टी20 सामना – नागपूर (वेळ – संध्या. 7 वाजता)

कसोटी मालिका –

14-18 नोव्हेंबर – पहिली कसोटी – इंदोर (वेळ – सकाळी 9.30 वाजता)

22-26 नोव्हेंबर – दुसरी कसोटी – कोलकता (वेळ – सकाळी 9.30 वाजता)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---