दक्षिण आफ्रिकेचा महान वेगवान गोलंदाज ऍलन डोनाल्ड याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे उदाहरण देत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका खेळणाऱ्या भारतीय संघाच्या फलंदाजांना काही महत्त्वाचा सल्ला दिला आहे. दक्षिण आफ्रिकेत उत्तम कसोटी क्रिकेट खेळणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव फलंदाज आहे, असे या माजी प्रोटीज वेगवान गोलंदाजाने म्हटले आहे. यामागचे कारण स्पष्ट करताना त्याने सध्याच्या भारतीय कसोटी संघातील फलंदाजांनाही असेच करण्याचा सल्ला दिला आहे.
पीटीआयशी बोलताना ऍलन डोनाल्ड (Allen Donald) म्हणाला, “माझ्या माहितीनुसार आमच्याविरुद्ध चांगला खेळणारा एकमेव खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachi Tendulkar) होता. फलंदाजी करताना तो मधल्या स्टंपवर उभा न राहता इकडे तिकडे फिरायचा. तो पुढे सरकायचा आणि मग चेंडू सोडायचा. जर तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत चेंडू कसा सोडायचा हे माहित असेल तर तुम्ही येथे खूप धावा करू शकता. येथे तुम्हाला गोलंदाजाला तुमच्या जवळ येण्यास भाग पाडावे लागेल. जसजसा तो चेंडू तुमच्या जवळ टाकू लागतो, धावा काढण्याची शक्यता वाढू लागते.”
सचिन तेंडुलकर आणि वॉली हॅमंड हे दक्षिण आफ्रिकेतील एकमेव परदेशी फलंदाज आहेत ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. सचिनने येथे 15 कसोटी सामन्यात 1161 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 5 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) हे दोन फलंदाज दक्षिण आफ्रिकेत कसोटी शतके झळकावू शकले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजी सपशेल अपयशी ठरली होती. केएल राहुल आणि विराट कोहली यांच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने येथे चांगली कामगिरी केली नाही. भारतीय संघाला येथे डावाच्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत पुनरागमन करण्याचा भारतीय संघ सर्वतोपरी प्रयत्न करेल. हा सामना 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. (The shocking statement of the former fast bowler of Africa Said Sachin was the only batsman who)
हेही वाचा
टीम इंडिया क्रिकेट जगतात नवीन चोकर्स आहे का? पाहा माजी क्रिकेटपटूने काय उत्तर दिले
ब्रेकिंग! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी क्रिकेटप्रेमींना धक्का, डेव्हिड वॉर्नरचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा